बिग बॉस फेम जास्मीन भसीनने प्रकृतीबाबत केला मोठा खुलासा!

On: July 27, 2026 5:16 PM
---Advertisement---

Jasmin Bhasin | अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) गेल्या दीड महिन्यापासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेलेल्या जास्मीनची तेथे अचानक प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता एका मुलाखतीत तिने उपचार, चाचण्या आणि डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या गंभीर आजाराच्या संशयाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

दुबईत प्रकृती बिघडली, तापही कमी झाला नाही :

‘बिग बॉस’ फेम जास्मीन भसीन गेल्या महिन्यात तिच्या वाढदिवशी दुबईतील रुग्णालयात दाखल झाली होती. वाढदिवसाच्या निमित्ताने ती दुबईला पोहोचली होती, मात्र तेथे गेल्यानंतर लगेचच तिची तब्येत बिघडू लागली. दुसऱ्याच दिवशी तिला कणकण आणि ताप जाणवू लागला. सुरुवातीला प्रवास आणि थकव्यामुळे हा त्रास होत असावा, असे तिला वाटले. त्यामुळे तिने औषध घेतले, पण तिची प्रकृती सुधारली नाही. सलग तीन दिवस ताप कायम राहिल्यानंतर तिची तब्येत आणखी खालावली.

जास्मीनने सांगितले की, दुबईला पोहोचल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले आणि दुसऱ्या दिवशी ताप आल्याचे तिने सांगितले. थकव्यामुळेच हा त्रास होत असल्याचे समजून तिने पॅरासिटामॉल ड्रिप आणि आयव्ही फ्लुएड्स घेतले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही ताप कमी झाला नाही. अखेर तिने बॉयफ्रेंड अली गोणी (Aly Goni) आणि मित्रांना आपल्याला रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी शरीरातील संसर्ग आणि दाहाचे प्रमाण तपासण्यासाठी सीआरपी (CRP) चाचणी केली.

Jasmin Bhasin | आतड्याला सूज असल्याचे समोर :

जास्मीनच्या म्हणण्यानुसार, सामान्यतः सीआरपीची पातळी 0 ते 5 दरम्यान असते. मात्र, तिच्या चाचणीमध्ये ही पातळी तब्बल 323 इतकी आढळली. ही स्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. तपासणीनंतर तिच्या आतड्याच्या एका बाजूला सूज असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे एका गंभीर आजाराचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आणि पुढील उपचारांसाठी जास्मीन भारतात परतली.

जास्मीनने सांगितले की, सध्या देवाच्या कृपेने तिची प्रकृती सुधारली आहे. मात्र, मागील दीड महिन्यात ती वारंवार आजारी पडत असल्याने आता ‘मी पूर्णपणे बरी आहे’ असे म्हणतानाही तिला भीती वाटते. या संपूर्ण अनुभवाकडे ती स्वतःसाठी वेळ काढण्याचा आणि स्वतःची अधिक काळजी घेण्याचा संकेत म्हणून पाहत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता स्वतःच्या आरोग्याला अधिक महत्त्व देत असल्याचे तिने सांगितले.

News Title: Jasmin Bhasin Reveals Serious Health Struggle

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now