मराठा आरक्षणाबद्दल नाही, आता जरांगे पाटलांना नवी ऑफर!, पैसेसुद्धा मिळणार

On: September 9, 2023 12:09 PM
---Advertisement---

जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 11 वा दिवस आहे. मनोज जरांगे हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी तरुण गर्दी  करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आलीये. आता मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपट कधी रिलीज होणार? या चित्रपटात कोण प्रमुख भूमिका साकारणार? याबाबत जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहेत.

मनोज जरांगे यांच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाने चित्रपट बनवणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय सिनेमाचं प्राथमिक नाव ‘खळग’ असल्याची माहिती मिळतेय. या सिनेमाच्या मेकिंगसाठी खळग चित्रपटाची टीम जरांगे यांच्या भेटीला गेली असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात स्वतः मनोज जरांगे पाटील हे सुद्धा भूमिका सााकारणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्र सरकारने दिलं आहे. पण जरांगे यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. आता जरांगे-पाटील यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now