“…तर तिसरं महायुद्ध”, पुरुषांच्या मासिकपाळीबाबत जान्हवी कपूरचं वक्तव्य चर्चेत!

On: April 21, 2025 2:39 PM
janhavi kapoor
---Advertisement---

Janhvi Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मुलाखतीमध्ये बोलताना तिनं मासिकपाळीबाबत समाजात असलेल्या गैरसमजांविरोधात ठाम मत व्यक्त केलं.

‘त्या’ प्रश्नांवर जान्हवीचा संताप-

मुलाखतीत जान्हवीनं सांगितलं की, अनेकदा एखादी स्त्री नाराज असेल किंवा आपली बाजू ठामपणे मांडत असेल, तर तिला पुरुषांकडून विचारलं जातं – “तुला पाळी आलीये का?” हे विधान तिच्यासाठी अपमानास्पद असून, महिलांच्या भावनिक आणि शारीरिक परिस्थितीची योग्य समज नसलेली ही प्रतिक्रिया असल्याचं ती म्हणाली. महिलांचं शरीर आणि मानसिक अवस्था मासिकपाळीच्या वेळी अतिशय गुंतागुंतीच्या टप्प्यातून जातात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीच्या (Janhvi Kapoor) मते, जर कोणी पुरुष खरोखरीच संवेदनशील असेल, तर असं काही बोलण्याआधी त्यानं एक क्षण थांबायला हवं. ती म्हणाली, “ज्या पद्धतीनं आमचे हार्मोनल बदल होतात, त्या वेदना सहन करणं खूप कठीण असतं.”

“पुरुषांना मासिकपाळी असती, तर…”-

जान्हवीने स्पष्ट केलं की, पुरुष जर मासिकपाळीच्या अनुभवातून गेले असते, तर कदाचित एक मिनिटही त्यांनी ते सहन केलं नसतं. ती म्हणाली, “जर पुरुषांना मासिकपाळी असती, तर तिसरं महायुद्ध झालं असतं.” तिच्या मते, मासिकपाळीच्या काळात महिलांबाबत असलेली टीकात्मक आणि असंवेदनशील वृत्ती पूर्णपणे थांबवली पाहिजे.

तिच्या या विधानामुळे समाजात महिलांच्या आरोग्य आणि भावनांशी निगडित विषयांवर अधिक जागरूकता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मुलाखत अनेक महिलांच्या भावना व्यक्त करणारी ठरली आहे.

जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट,. –

2024 मध्ये जान्हवी कपूरचे ‘मिस्टर एंड मिसेज माही’, ‘उलझन’ आणि ‘देवरा पार्ट 1’ हे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सध्या ती ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच तिचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या शिवाय, जान्हवी ‘पेड्डी’ या चित्रपटातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती राम चरण, शिव राजकुमार, दिव्येंदु शर्मा आणि जगपती बाबू यांच्यासोबत झळकणार आहे. हा चित्रपट 27 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

News Title – Janhvi Kapoor Bold Take on Period Stigma

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now