Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला सरकारकडून 20 लाखांचं रोख बक्षीस जाहीर!

On: April 23, 2025 10:03 PM
Jammu-Kashmir Attack Reward for Terror Info 20 Lakh
---Advertisement---

Jammu-Kashmir Attack | पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून एकामागोमाग एक कठोर निर्णय घेतले जात आहेत. हल्ल्यानंतर केवळ निषेध नाही तर थेट कारवाईचा सूर घेत केंद्राने पाकिस्तानविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांविरोधात माहिती देणाऱ्यांसाठी मोठं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. (Jammu-Kashmir Attack)

दहशतवाद्यांची माहिती दिल्यास 20 लाखांचं बक्षीस

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग पोलिसांकडून (Anantnag Police) जाहीर करण्यात आले आहे की, पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविषयी कोणतीही खात्रीशीर माहिती पुरवणाऱ्याला 20 लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल.

संबंधित व्यक्तीची ओळख अत्यंत गुप्त ठेवली जाणार असून, सुरक्षा यंत्रणांशी संपर्कासाठी विशेष क्रमांक आणि ईमेल आयडी देण्यात आले आहेत.

संपर्क क्रमांक व ईमेल:

एसएसपी अनंतनाग: 9596777666

पीसीआर अनंतनाग: 9696777669

ईमेल: [email protected]

केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात कडक निर्णय

हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे. या हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला आहे. तसेच अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नवीन पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

या कठोर निर्णयांच्या माध्यमातून केंद्र सरकारने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की, दहशतवादाला सहन केलं जाणार नाही. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र भावना उमटत आहेत.

Title : Jammu-Kashmir Attack Reward for Terror Info 20 Lakh Cash Announced

 

 

Join WhatsApp Group

Join Now