Jalgaon News | रावेर लोकसभा (Raver Losabha) मतदारसंघ लोकसभा निवडणुकीआधी चांगलाच चर्चेत आला आहे, कारण इथं एक लक्ष्यवेधी लढत पहायला मिळू शकते. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तसेच आपण रावेर लोकसभा मतदारसंघातून उभं राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे, त्याच्या या वक्तव्यामुळे नवीच चर्चा सुरु झाली आहे.
रावेरमध्ये (Jalgaon) सध्या रक्षा खडसे विद्यमान खासदार आहेत, त्या एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत. सासरे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत गेले मात्र त्यांनी अद्याप भाजपची साथ सोडलेली नाही, त्या भाजपमध्येच असून पक्षाचं काम जोमानं करताना पहायला मिळत आहेत. अशात सासऱ्यांनी यात मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्यानं या मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?-
रावेर लोकसभा मतदारसंघाची (Jalgaon) जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. रावेरची जागा लढण्यासाठी मी स्वतः इच्छुक आहे. ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर माझ्याच नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती मी पक्षाला केली आहे. पक्षाने माझ्या विनंतीला मान दिला आहे आणि मला रावेर लोकसभेची जागा लढण्यास सांगितलं आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
रक्षा खडसेंनी सुद्धा थोपटले दंड-
एकनाथ खडसे यांनी रावेर (Jalgaon) लोकसभा लढण्याची घोषणा केल्यानंतर सुनबाईंनी हार मानलेली नाही. त्यांनी सुद्धा लोकसभा लढण्यासाठी दंड थोपटले आहेत. पक्षाने मला पुन्हा एकदा लोकसभा लढण्याची संधी दिली तर मी तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवार असेल. माझी स्वतःची रावेरमधून (Jalgaon) लढण्याची तयारी आहे. शेवटी पक्ष याबाबत काय निर्णय घेईल हे महत्त्वाचं आहे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.
रक्षा खडसे रावेर लढण्याबाबत इच्छुक असल्या तरी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने रक्षा यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का?, यावर प्रश्नचिन्ह आहे. या लोकसभा जागेवरुन आता भाजपच्या गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. रक्षा खडसे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी यावर सुद्धा भाष्य केलं.
लोकसभेसाठी गिरीश महाजन यांचं नाव पुढं येत असेल तर माझी काहीच हरकत नाही. ते आमचे नेते आहेत, पक्षाने आदेश दिला तर आम्ही सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांनाच जास्तीत जास्त मताने निवडून आणू, असंही रक्षा खडसे म्हणाल्या. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे आणि तेच पुन्हा पंतप्रधान होतील, असंही त्यांनी म्हटलं.
News Title: Jalgaon Raver loksabha eknath khadse vs raksha khadse
महत्त्वाच्या बातम्या-
Pune News | पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद… मनस्ताप टाळायचा असेल तर आत्ताच वाचा
Asha Negi | ‘निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
1 जानेवारीपासून होणार ‘हे’ बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम
Malaika Arora | मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या नात्यात मिठाचा खडा, समोर आली धक्कादायक बातमी






