‘भिडू’ शब्द वापरायचा असेल तर माझी परवानगी घ्या!, जग्गू दादा कारवाईच्या तयारीत

On: May 14, 2024 5:37 PM
Jackey Shroff
---Advertisement---

Jackie Shroff | बॉलिवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे नेहमी चर्चेत असतात. त्यांचं राहनीमान हे अगदी साधं असलं तरीही त्यांच्या स्वभावातला खट्याळपणा अनेकदा आपण सोशल मीडियावरील व्हिडीओत पाहतो. जॅकीदादा देखील मुंबईच्या दहा बाय दहाच्या खोलीत जन्माला आले. त्यांचं निम्म आयुष्य हे दहा बाय दहाच्या खोलीत गेलं. (Jackie Shroff)

लहानपणापासून मुंबईतील चाळीत राहिल्याने मुंबईची भाषा ही जग्गूदादांच्या ओठी आजही आहे. त्यातल्या त्यात भिडू या शब्दाचे जनक जणू काही जग्गू दादाच आहेत. अनेकजन भिडू या शब्दाचा वापर करत असतात. मात्र कलाकारांची एक ओळख असते. त्याचे व्यक्तीमत्त्व अनेकदा चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दावा जग्गूदादांचा आहे. यामुळे आता भिडू नाव घेणं म्हणजे चोरीचा विषय आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. (Jackie Shroff)

भिडू शब्दावरून जॅकी श्रॉफ दिल्ली हायकोर्टात

यामुळे आता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी थेट दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. भिडू हा शब्द म्हणजे जग्गू दादांची आयडेंटी आहे. आपलं नाव, आपला आवाज याचा बेकादेशीर वापर होत आहे. यामुळे थेट याचिका दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर काही लोकं ही व्यवसायिक वापरासाठी देखील त्यांची आयडेंटी असलेल्या भिडू या नावाचा उल्लेख करताना दिसत आहेत.

यामुळे आता लोकांविरोधात हा खटला दाखल करण्यात आल्याचं जॉकी श्रॉफ यांच्या बाजूनं सांगण्यात आलं. या गोष्टींचा गैरवापर होत असल्याने जॅकी नाराज आहे. जॅकीच्या बाजूने वकील प्रवीण आनंद यांनी पब्लिसीटी हक्काचं उल्लंघन होण्याबाबत सांगितलं आहे.

सेलिब्रिटींची पर्सनॅलिटी राईट्सबाबत काळजी

यावेळी बोलत असताना त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांच्या सेलिब्रिटींची पर्सनॅलिटी राईट्सबाबत काळजी व्यक्त केली. भिडू हा शब्द जॅकीचा ट्रेडमार्क आहे. एक व्यक्ती भिडू या नावाने आपला व्यवसाय करतो, असं वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयात सांगितलं.

सुनावणीला काहीजन आले होते. त्यांनी सांगितलं की, आम्ही जॅकी श्रॉफचा फोटो वॉलपेपर मोबाईल वापरणं बंद केलं असल्याचं काहींनी सांगितलं आहे. लोकं पोस्टर्स वापरतात तसेच टी शर्ट वापरतात त्यांना परवानगी विना असं काही करता येणार नसल्याची माहिती समोर आली.

News Title – Jackie Shroff Moves Delhi High Court Again Using His Photo, Voice And Bhidu Words

महत्त्वाच्या बातम्या

“उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, छगन भुजबळांनी घेतली ठाकरेंची बाजू

पहाटेच्या शपथविधीबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

नवऱ्यासाठी धावून आली अथिया शेट्टी; के.एल. राहुलशी वाद घालणाऱ्या संजय गोयंकांना चांगलंच झापलं?

उर्फी जावेदने केलंय टक्कल?; फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल

उपोषणाबाबत मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!

Join WhatsApp Group

Join Now