पहाटेच्या शपथविधीबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

On: May 14, 2024 4:05 PM
Ajit Pawar
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी 2019 साली भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला कारण शरद पवारांबद्दलचं काँग्रेस नेत्यांचे वाक्य मनाला लागलं आणि त्याची परिणीती सकाळचा शपथ विधी आहे, असे तटकरेंनी सांगितलं आहे. ते ‘एबीपी माझा’ महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.

सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

आमची दोन्हीकडे चर्चा सुरू होती. भाजप, शिवसेना- काँग्रेसबरोबर चर्चा सुरू त्यातून महाविकास आघाडी आली. तो पहाटेचा नाही सकाळी 8 चा शपथविधी होता. त्याला देखील काही कारणे होती. दिल्लीत ठरलं त्या संदर्भात मुंबईला नेहरु सेंटरमध्ये एक बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून पवारांच्या विश्वासहार्तेसंदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले, असं तटकरेंनी (Sunil Tatkare) सांगितलंय.

“2017 साली आम्ही भाजपसोबत जाण्याची तयारी केली”

2017 साली आम्ही भाजपसोबत जाण्यची तयारी केली. त्यानंतर आम्ही अमित शहा यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली. पितृपक्षाच्या आत सरकारमध्ये कधी जायचे एवढाच निर्णय घेण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो, असं सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) सांगितलं.

प्रस्ताव सांगितल्यानंतर अमित शाह म्हणाले, शिवसेना आमच्यासोबत राहणार आम्हाला अपेक्षीत होते की ते शिवसेनेला काढतील पण त्यांनी ठाम नकार दिला. ते म्हणाले, अडवाणी, वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एनडीए तयार केले आहे. आम्ही शिवसेनेला बाहेर जा असे सांगणार नाही. तुम्ही आल्यानंतर शिवसेना बाहेर गेली तर आमची हरकत नसेल. पण आम्हाला ते पसंत नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

Sunil Tatkare | “ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती”

2021 मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक होते, असं तटकरेंनी (Sunil Tatkare) सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

नवऱ्यासाठी धावून आली अथिया शेट्टी; के.एल. राहुलशी वाद घालणाऱ्या संजय गोयंकांना चांगलंच झापलं?

उर्फी जावेदने केलंय टक्कल?; फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल

उपोषणाबाबत मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!

“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा

मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now