तुम्ही ITR भरला का? ही तारीख चुकली तर भरावा लागेल हजारोंचा दंड; आताच चेक करा

On: August 11, 2025 1:32 PM
ITR Deadline Extension
---Advertisement---

ITR Deadline | इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची अपडेट आली आहे. आयकर विभागाने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप रिटर्न फाइल केलेला नाही, त्यांना अतिरिक्त 32 दिवसांचा अवधी मिळाला आहे. मात्र, ही तारीख चुकल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो.

सरकारने स्पष्ट केले आहे की, 15 सप्टेंबरनंतर देखील रिटर्न दाखल करता येईल, परंतु त्यासाठी दंड भरावा लागेल. हा दंड 31 डिसेंबर 2025 पर्यंत भरून ‘लेटकम फाइलिंग’ करता येईल. 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1,000 रुपये, तर त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर 5,000 रुपये दंड आकारला जाईल. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये 31 डिसेंबरनंतर ‘अपडेटेड रिटर्न’ दाखल करण्याची मुभा आहे, मात्र त्यासाठी ठराविक अटी लागू आहेत. (ITR Deadline)

वेळेत ITR न भरल्यास होणारे तोटे :

– उत्पन्नावर लागू असलेला कर थेट वसूल केला जाईल.

– थकीत कररकमेवर व्याज भरावे लागेल.

– 31 मार्च 2025 पर्यंत संपूर्ण आगाऊ कर न भरल्यास व्याज आणि दंड दोन्ही लागू शकतात.

– भविष्यात लोन, व्हिसा किंवा आर्थिक व्यवहार करताना ITR नसेल तर अडचणी येऊ शकतात.

ITR Deadline | ITR कसा भरावा? :

ITR भरण्यासाठी तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.incometax.gov.in) लॉगिन करू शकता. यासाठी तुमच्याकडे खालील माहिती असणे आवश्यक आहे –

– PAN नंबर

– आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर

– बँक अकाउंट डिटेल्स

– उत्पन्न आणि कराशी संबंधित कागदपत्रे

रिटर्न स्वतः भरता येईल किंवा चार्टर्ड अकाऊंटंट (CA) ची मदत घेऊन देखील फाइल करता येईल.

लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या तारखा :

15 सप्टेंबर 2025: अंतिम तारीख (दंडाशिवाय ITR फाइलिंग)

31 डिसेंबर 2025: लेटकम फाइलिंगची शेवटची तारीख (दंडासह)

31 मार्च 2026: अपडेटेड रिटर्नची अंतिम तारीख (विशिष्ट अटींसह)

सरकारने करदात्यांना वेळेत ITR भरून दंड टाळण्याचे आवाहन केले आहे. अजूनही रिटर्न न भरलेल्या करदात्यांनी ही संधी गमावू नये, कारण उशिरा फाइल केल्यास केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर भविष्यातील व्यवहारांवरही परिणाम होऊ शकतो.

News Title: ITR Filing Deadline Extended to 15 September 2025: Penalty Up to ₹10,000 If Missed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now