भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

On: November 2, 2023 8:19 PM
---Advertisement---

वर्धा | लोकसभेच्या निवडणुकांचं  बिगुल वाजल्यात जमा आहे. विविध राजकीय पक्ष सध्या इलेक्शन मोडवर आहेत. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे भाजपचे मनसुबे असल्याचं समोर आलं आहे. मात्र भाजपबद्दल लोकांमध्ये रोष वाढत आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम चालू केला आहे. भाजपच्या महाविजय 2024 संकल्प यात्रेनिमित्त ते यावेळी वर्धा जिल्ह्यात आहे. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माईक घेऊन बावनकुळे नागरिकांनी प्रश्न विचारत होते, मात्र यावेळी त्यांच्यासोबत जो प्रकार झाला तो पाहता भाजपविरोधात लोकांमध्ये असंतोष वाढतोय, अशी शंका घेण्यासारखा प्रसंग घडला आहे.

नेमकं काय घडलं बावनकुळे यांच्यासोबत?

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का?, असा प्रश्न बावनकुळे लोकांना विचारत होते, त्यावेळी एका महिलेने त्यांची चांगलीच फजिती केली. कशाला महागाई वाढवायला मोदी पंतप्रधान व्हायला हवेत का? सरकार विजबील वाढवून देतं, सिलेंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का?, असा थेट प्रश्नच तीने बावनकुळेंना विचारला. महिलेच्या प्रश्नांमुळे बावनकुळेंनी माईक लपवला. त्यावर आता का माईक लपवला?, असा सवाल करत त्यांनी बावनकुळेंची फजिती केली.

वर्धा शहरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंतच्या यात्रेदरम्यान हा प्रकार घडला. बावनकुळेंनी हा प्रकार हसण्यावारी नेला. आपण स्टेजवर बोलू, तुम्ही स्टेजवर चला, असे म्हणत बावनकुळेंनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

महिलेच्या बोलण्याला चंद्रशेखर बावनकुळेंनी हसण्यावारी नेलं असलं तरी भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. याआधीही कोकणात एका तरुणाने बावनकुळेंची फजिती केली होती. पंतप्रधान कोण हवा?, प्रश्नावर त्याने राहुल गांधी असं उत्तर दिलं होतं. या घटनांमुळे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरायला लागली आहे का?, असाही सवाल आहे. महागाईचे चटके बसल्याने जनता हुशार झाली आहे. भाजपविरोधात लोक आता बोलायला लागले आहेत. प्रदेशाध्यक्षांना लोक थेट बोलत आहेत म्हणजे भाजपविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. भाजपने लोकांच्या या प्रतिक्रियांना हलक्यात घेण्याची चूक केल्यास त्यांना मोठा फटका नक्की बसू शकतो.

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय का?, सोशल मीडियावरील या बातमीखालील कमेंटमध्ये प्रश्नाचं उत्तर नक्की सांगा

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!

राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

 

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now