नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे(Shivsena) पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ कोणाचा यावर वाद सुरू आहे. या वादावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली.
या सुनावणीत ठाकरे(Uddhav Thackeray) गटाकडून अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला.
शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा ठाकरे गटाची आहे. पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी या सभेचा भाग होऊ शकत नाहीत, त्यामुळं प्रतिनिधी सभाच शिंदे गटाची(Eknath Shinde) नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभेनुसार पक्ष चालतो आणि प्रतिनिधी सभाच ठाकरेंकडं आहे, असं मत आयोगासमोर मांडत सिब्बल यांनी आयोगासमोर महत्वाचा मुद्दा मांडला आहे.
पक्षाच्या प्रतिनिधी सभेला हजेरी न लावता शिंदे गटातील आमदार गुहावटीला का गेले?, असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी लोकशाहीच्या मार्गानं आपलं म्हणनं मांडायला पाहीजे होतं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटानं कागदपत्र सादर केली आहेत का ?, असा प्रश्न उपस्थित करत सिब्बल यांनी शिंदे गट राजकीय पक्षच नाही, असा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या-






