गुडन्यूज! आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

On: February 2, 2024 6:55 PM
IRDAI Insurance
---Advertisement---

IRDAI Insurance | (1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. आता दुसऱ्याच दिवशी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. विमा नियामक प्राधिकरणाने (IRDAI Insurance) सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामन्यांना मोठा फायदा होणार आहे.

होमिओपॅथी, योगा आणि आयुर्वेद उपचारांना विमा

इरडाने (IRDAI Insurance) सर्व विमा कंपन्यांना त्यांच्या पॉलिसीमध्ये आयुष उपचाराचा समावेश करण्याची सूचना केली आहे. या निर्णयासाठी विमा कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळाकडून मंजूरी घेण्याची सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 1 फेब्रुवारीचा वेळ देण्यात आला होता.

यासंबंधी मार्गदर्शक सूचना मागवण्याचे काम सुरू होते. आता नवीन धोरणानुसार आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी या सर्व उपचार पद्धतींना विमा मिळणार आहे. या सर्व उपचारांवर पॉलिसी लागू करण्यात येणार आहे.

यामुळे अनेक लोकांना फायदाच फायदा होणार आहे. तसेच, यामुळे विमा पॉलिसीही अधिक प्रचलित होईल. या सर्व सूचना या नव्या चालू वर्षात लागू करण्यात येतील. IRDAI ने यासंबंधी विमा कंपन्यांना काही सूचना केल्या आहेत.

IRDAI च्या विमा कंपन्यांना सूचना

IRDAI च्या सूचनेनुसार कंपन्यांना गुणवत्ता आणि दर्जावर अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच या सर्व उपचार पद्धती ज्या रुग्णालयात केल्या जाणार आहेत, तिथे सर्व व्यवहार कॅशलेस करणे बंधनकारक असणार आहे. आता विमा कंपन्यांना आयुष उपचार करण्यासाठी पॉलिसी (IRDAI Insurance) आणावी लागणार आहे.

यासंदर्भात जनरल इन्शुरन्स काऊन्सिल देशातील सर्व विमा कंपन्यासोबत चर्चा करत आहे. 2023 मध्ये मद्रास हायकोर्टाने IRDAI ला याबाबत आदेश दिला होता. त्यामुळे नागरिकांना आता उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे.

News Title-  IRDAI Insurance

महत्त्वाच्या बातम्या –

IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद

बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”

Maratha Reservation: मराठा समाजाविरोधात कोर्टात धाव घेतलेल्या ओबीसी संघटनांना मोठा झटका

‘तू आमदार तुझ्या घरी, पाय उखडून टाकायला कार्यकर्ते….’; रूपाली पाटील भडकल्या

Join WhatsApp Group

Join Now