IRCTC | हिंदू धर्मात भगवान शंकराला एक उच्च स्थान आहे आणि भाविक त्यांची विविध रूपांमध्ये पूजा करतात. याच श्रद्धेला मान देत, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) भाविकांसाठी भारतातील ७ प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची संधी घेऊन आले आहे. आपल्या देशात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहेत, जे विविध राज्यांमध्ये स्थित आहेत.
सात ज्योतिर्लिंगांचा समावेश :
हिंदू धर्मावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकालाच या सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची इच्छा असते. जर तुमचीही इच्छा अजून पूर्ण झाली नसेल, तर IRCTC च्या या खास टूर पॅकेजमुळे तुम्ही एकाच वेळी तब्बल सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या टूर पॅकेजसाठी तुम्हाला किती रुपये खर्च करावे लागतील.
या टूर पॅकेजमध्ये उज्जैनमधील (Ujjain) महाकालेश्वर (Mahakaleshwar) आणि ओंकारेश्वर (Omkareshwar) ज्योतिर्लिंग, गुजरात मधील (Gujarat) सोमनाथ (Somnath) आणि नागेश्वर (Nageshwar) ज्योतिर्लिंग, नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील (Pune) भीमाशंकर (Bhimashankar) ज्योतिर्लिंग आणि औरंगाबादमधील (Aurangabad) घृष्णेश्वर (Ghrushneshwar) ज्योतिर्लिंग अशा सात ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे. म्हणजेच, एकाच बुकिंगमध्ये तुम्हाला या सर्व पवित्र स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
IRCTC | या पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहण्याची सोय :
IRCTC चे हे ज्योतिर्लिंग टूर पॅकेज ११ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत असणार आहे. या टूरसाठी तुम्ही ऋषिकेश (Rishikesh), हरिद्वार (Haridwar), हरदोई (Hardoi), मुरादाबाद (Moradabad), बरेली (Bareilly), लखनऊ (Lucknow), शाहजहांपूर (Shahjahanpur), कानपूर (Kanpur), झांसी (Jhansi), उरई (Orai) आणि ललितपूर (Lalitpur) या कोणत्याही स्टेशनवरून बुकिंग करू शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला कंफर्म (Comfort), स्टँडर्ड आणि स्लीपर अशा तीन श्रेणींमध्ये बुकिंग करण्याची संधी मिळेल. कंफर्ट श्रेणीतील प्रति व्यक्ती भाडे ५२,२०० रुपये आहे. तर, स्टँडर्ड श्रेणीतील प्रति व्यक्ती भाडे ३९,५५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, स्लीपर श्रेणीतील प्रति व्यक्ती भाडे २३,२०० रुपये आहे. या पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहण्याची सोय, शुद्ध शाकाहारी भोजन, चहा-पाणी, स्थानिक ठिकाणी फिरण्यासाठी बस, स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा आणि टूर गाईड यांसारख्या सर्व सुविधांचा समावेश आहे.
जर तुम्हाला IRCTC चे हे ज्योतिर्लिंग टूर पॅकेज बुक करायचे असेल, तर तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctctourism.com वर ऑनलाइन बुकिंग करू शकता. याशिवाय, लखनऊमधील गोमती नगर येथील IRCTC च्या कार्यालयातून ऑफलाइन बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ८२८७९३०१९९, ९२३६३९१९०८, ९२३६३९१९१०, ९४१७१०५५४४, ७३०२८२१८६४ या क्रमांकांवर संपर्क साधून पॅकेजची सविस्तर माहिती मिळवू शकता.






