भारताला इराणकडून सर्वात मोठा धक्का! घेतला मोठा निर्णय

On: March 4, 2026 8:24 PM
Iran India
---Advertisement---

Iran India | इस्रायल (Israel), अमेरिका (United States of America) आणि इराण (Iran) यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस सुरू असताना इराणने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घोषणेमुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

होर्मुज सामुद्रधुनीबाबत इराणची कठोर भूमिका

इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर तीव्र हल्ले झाल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला. या लढाईत इराणचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनीही प्रत्युत्तरात्मक कारवाया केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इराणने होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्याचा इशारा दिला होता. आता त्या इशाऱ्यानंतर प्रत्यक्षात मोठी घोषणा करत इराणने या महत्त्वाच्या जलमार्गावरील वाहतुकीवर निर्बंध लावले आहेत.

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (Islamic Revolutionary Guard Corps) अर्थात आयआरजीसी (IRGC) च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या मार्गाने केवळ चीन (China) येथील जहाजांनाच प्रवासाची परवानगी असेल. पाश्चात्त्य देश किंवा त्यांच्या सहयोगी राष्ट्रांतील कोणतेही जहाज या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर हल्ला करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. चीनव्यतिरिक्त इतर कोणालाही सवलत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Iran India | भारतावर परिणाम, ट्रम्प यांची प्रतिक्रिया

होर्मुज सामुद्रधुनीतून भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा फटका बसू शकतो. इंधन पुरवठा खंडित झाल्यास देशात पेट्रोल-डिझेल तुटवड्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा निर्णय गंभीर मानला जात आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही या घडामोडींवर भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकन सैन्य या सागरी मार्गाला संरक्षण देईल आणि तेलवाहतूक सुरळीत सुरू राहील, असे त्यांनी जाहीर केले. जागतिक स्तरावर इंधन टंचाई होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या सागरी मार्गाभोवती तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

News title : Iran Restricts Hormuz, India Impact

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now