Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न

On: January 10, 2024 11:34 AM
Ira Khan Nupur Shikhre Marriage
---Advertisement---

Ira khan | अभिनेता आमिर खानची (Amir khan) मुलगी आयरा खानने (Ira khan) फिटनेस कोच नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare)नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. यानंतर आता आयरा आणि नुपूर धार्मिक रिती-रीवाजाने विवाह करणार आहेत. याची सुरुवात मेहंदीने झाली असून या जोडप्याची संगीत सेरेमनी ठेवण्यात आली आहे. उदयपुरच्या ताज अरावली हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

त्यामुळे सोशल मिडीयावर सध्या आयरा आणि नुपूरच्या लग्नाचीच अधिक चर्चा होत आहे. यापूर्वी नुपूरने नोंदणी विवाहात परिधान केलेल्या बनियनमुळे त्याच्यावर टीका करण्यात आली होती. आता तो लग्नात कोणती ड्रेसिंग करणार याची चाहते वाट पाहत आहेत.

आयरा-नुपूर करणार मराठी पद्धतीने लग्न

आमिरची लाडकी लेक आयरा (Ira khan) आणि नुपूर मराठी पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लग्नात त्यांचा पोशाख कसा असणार, लग्न मंडप कसा असेल यासोबतच आमीर आणि किरण राव यांच्या लुकबाबत वेगवेगळे अंदाज चाहत्यांकडून बांधले जात आहेत.

आयराच्या मेहेंदी सेरेमनीमध्ये सर्व पाहुणे बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचताना दिसले. त्यात रात्री एक ‘पायजमा पार्टी’देखील झाली. मेहेंदीनंतर आता आज सायंकाळी 7 वाजल्यापासून संगीत सोहळा सुरु होणार आहे. संगीतसाठी देखील खास तयारी करण्यात आली आहे.

‘या’ ठिकाणी होणार रिसेप्शन

या शाही विवाहासाठी ताज आरवली हॉटेलच्या तब्बल 176 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. उदयपूरमध्ये लग्न केल्यानंतर आयरा (Ira khan)  व नूपुर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी देणार आहेत. लग्नातील एक वेगळी गोष्ट म्हणजे, या जोडप्याने सहभागी होणाऱ्या कोणत्याच पाहुण्यांकडून भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला आहे. नोंदणी विवाह दरम्यान त्यांनी घातलेल्या अतिशय सिंपल पोशाखामुळे त्यांचे कौतुकही झाले. मात्र, त्यांच्या या निर्णयाचीही आता चर्चा होत आहे.

उदयपूरमध्ये हा शाही विवाह झाल्यानंतर मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनचे अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, करण जोहर, अक्षय कुमार, करीना कपूर, राजकुमार हिरानी, ​​आशुतोष गोवारीकर यांसह अनेक कलाकारांची रिसेप्शनमध्ये उपस्थिती असणार आहे.

News Title- Ira Khan Nupur Shikhre Marriage 

महत्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | सलमान खान आणि तब्बू लग्न करणार?; बिग बॉसच्या मंचावर केला खुलासा

दोस्त दोस्त ना रहा…, Sharad Mohol च्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणात नवा अँगल; महत्त्वाची माहिती समोर

Sharad Mohol l शरद मोहोळ प्रकरणात पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती!

Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान

Join WhatsApp Group

Join Now