IPL Auction 2024 | वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला नडला, आता भारतानंच केलं मालामाल

On: December 19, 2023 2:46 PM
IPL Auction 2024
---Advertisement---

IPL Auction 2024 | विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा (Travis Head) सनरायझर्स हैदराबाद संघाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.

IPL Auction 2024 | Travis Head हैदराबाद संघाच्या ताफ्यात

लिलावादरम्यान (IPL Auction 2024) त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि हैदराबाद यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र येथे एसआरएच संघ विजयी ठरला. फ्रँचायझीने 6 कोटी 80 लाख रुपयांच्या मोठ्या रकमेसह त्यांचा ताफ्यात समावेश केला आहे.

IPL Auction 2024 | Travis Head मालामाल

लिलावादरम्यान ट्रॅव्हिस हेडसाठी दोन्ही संघांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. तर अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथमध्ये कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. तो 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता, परंतु कोणत्याही फ्रेंचायझीने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यात रस दाखवला नाही.

विश्वचषकात या दोन खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद होती. हेडने आक्रमक फलंदाजी करत संघासाठी अंतिम सामन्यात शतक झळकावलं होतं. त्यामुळे कांगारू संघ सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला.

अंतिम सामन्यात हेडने डावाची सुरुवात करताना एकूण 120 चेंडूंचा सामना केला होता. दरम्यान, तो 114.17 च्या स्ट्राइक रेटने 137 धावा करण्यात यशस्वी झाला. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 15 चौकार आणि चार उत्कृष्ट षटकार मारले गेलेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL Auction 2024 | रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात, मोजले ‘इतके’ कोटी रुपये

Indian Premier League | Rovman Powell वर लागली पहिली बोली, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

Sharmila Thackeray | “मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तसा तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?”

Supriya Sule | आताची मोठी बातमी; सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

Naveen-Ul-Haq | मोठी बातमी! ‘या’ स्टार खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now