IPL Auction 2024 | ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या Pat Cumminsवर पैशांचा पाऊस, बोली थांबता थांबेना… शेवटी

On: December 19, 2023 2:44 PM
IPL Auction 2024 | Pat Cummins
---Advertisement---

IPL Auction 2024 | ऑस्ट्रेलियाला नुकताच एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार पॅट कमिन्सवर यंदाच्या आयपीएलच्या लिलावात चक्क पैशांचा पाऊस पडलेला पहायला मिळाला. त्याला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये चांगलीच चुरस लागली होती.

पॅट कमिन्सने आपली बेस प्राईज (Pat Cummins Base Price) अवघी 2 कोटी रुपये ठेवली होती, मात्र त्याच्यावर बोली लावण्यासाठी आयपीएलच्या संघांमध्ये झुंबड उडाली होती. अखेर सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले.

किती लागली पॅट कमिन्सवर बोली?

मंगळवारी, दि. 19 डिसेंबर रोजी दुबई येथे इंडियन प्रीमिअर लीग 2024चा लिलाव पार पडत आहे. या लिलावात आतापर्यंत पॅट कमिन्स सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली.

IPL Auction 2024: Pat goes to Sunrisers Hyderabad

पॅट कमिन्सला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघांमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. 2 कोटी रुपयांपासून सुरु झालेली बोली हळूहळू पुढं सरकत होती. 10 कोटी पार केल्यानंतर बेंगलो आणि हैदराबाद संघांनी आपले सर्व प्रयत्न पणाला लावले.

20 कोटी पार केल्यावर टाळ्याच टाळ्या-

बेंगळुरु संघाला या बोलीमध्ये माघार घ्यावी लागली. 20 कोटी रुपये पार केल्यानंतर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तरी बोली थांबण्याचं नाव घेत नव्हती. अखेरीस हैदराबादनेच त्याला 20 कोटी 50 लाख रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं.

2023 World Cup winning captain Pat Cummins goes to Sunrisers Hyderabad for a whopping 20.5 Crore rupees

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Auction 2024 | वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला नडला, आता भारतानंच केलं मालामाल

IPL Auction 2024 | रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात, मोजले ‘इतके’ कोटी रुपये

Indian Premier League | Rovman Powell वर लागली पहिली बोली, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

Sharmila Thackeray | “मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तसा तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?”

Supriya Sule | आताची मोठी बातमी; सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now