धोनीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला होणार पुनरागमन

On: April 10, 2026 5:55 PM
MS Dhoni
---Advertisement---

MS Dhoni | आयपीएल 2026 मध्ये Chennai Super Kings (CSK) ची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग तीन सामन्यांत पराभव झाल्यामुळे संघावर दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत Mahendra Singh Dhoni मैदानात उतरणार का, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

संघाच्या या खराब कामगिरीमागे धोनीची अनुपस्थिती हे एक मोठं कारण मानलं जात आहे. अनुभवी कर्णधार आणि विकेटकीपर असलेल्या धोनीच्या मार्गदर्शनाचा अभाव संघाला जाणवत आहे.

11 एप्रिलच्या सामन्यातही धोनी बाहेरच :

मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी Delhi Capitals विरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी खेळणार नाही. हा सामना M. A. Chidambaram Stadium येथे होणार आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे तो अद्याप पूर्णपणे फिट नसल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

फ्रेंचायझीकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं की, धोनी सुरुवातीचे दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. त्यामुळे या सामन्यात त्याची अनुपस्थिती निश्चित मानली जात आहे.

MS Dhoni | ‘या’ तारखेला पुनरागमनाची शक्यता :

धोनीच्या पुनरागमनाबाबत आता नवी तारीख समोर आली आहे. 14 एप्रिल रोजी Kolkata Knight Riders विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, तो पूर्णपणे फिट असेल तरच मैदानात उतरेल, अन्यथा त्याला आणखी विश्रांती दिली जाऊ शकते. जर तो खेळला, तर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून त्याचा वापर होण्याचीही शक्यता आहे. सध्या तो चेन्नईमध्ये राहून संघाच्या सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली पुनर्वसन उपचार घेत आहे.

दरम्यान, संघासाठी आणखी एक दिलासादायक बातमी म्हणजे युवा फलंदाज Dewald Brevis लवकरच पुनरागमन करू शकतो. दुखापतीतून सावरत तो 11 एप्रिलपासून खेळण्यास तयार असल्याचं संकेत दिले आहेत.

एकूणच, CSK चाहत्यांसाठी धोनीचं पुनरागमन अत्यंत महत्त्वाचं ठरणार असून, 14 एप्रिलच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: IPL 2026: MS Dhoni Likely to Return on April 14 vs KKR, Misses Match Against Delhi Capitals

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now