आज MI Vs SRH येणार आमने- सामने; विजयाचं खातं कोण उघडणार?

On: March 27, 2024 11:16 AM
IPL 2024 SRH vs MI
---Advertisement---

IPL 2024 SRH vs MI l आयपीएल 2024 चा 8 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता आज MI Vs SRH हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात शानदार खेळ केला, मात्र अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर आज होणाऱ्या सामन्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

IPL 2024 चा SRH vs MI सामना कधी खेळला जाईल? :

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 मधील आठवा सामना आज म्हणजेच 27 मार्च रोजी होणार आहे.

SRH विरुद्ध MI यांच्यातील IPL 2024 चा आठवा सामना कोठे खेळवला जाईल? :

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

SRH विरुद्ध MI सामना किती वाजता सुरू होईल? :

IPL 2024 चा आठवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. मात्र टॉस अर्धा तास आधी होईल.

SRH vs MI सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठं पाहता येणार? :

स्टार स्पोर्ट्स चॅनलवर टीव्हीवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचा थेट सामना तुम्ही पाहू शकता.

IPL 2024 SRH vs MI l तुम्ही SRH vs MI सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? :

तुम्ही Jio Cinema ॲपवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचे लाइव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहू शकता.

News Title- IPL 2024 SRH vs MI

महत्त्वाच्या बातम्या –

सलग दोन सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्स ठरला नंबर-1

रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now