KKR चा संघ लखनौला रोखणार का? दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार

On: April 14, 2024 12:26 PM
IPL 2024 KKR vs LSG
---Advertisement---

IPL 2024 KKR vs LSG l आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार आहेत. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघांना मोसमातील चौथा विजय मिळवायचा आहे. केकेआरने आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर लखनौला 5 पैकी 3 सामने जिंकता आले आहेत. KKR हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे, तर लखनौ संघ चौथ्या स्थानावर आहे. अशास्थितीत आजचा सामना जिंकून लखनौचा संघ कोलकात्याकडून नंबर 2 चे स्थान हिसकावून घेऊ शकतो.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असेल?

कोलकाताचे ईडन गार्डन हे फलंदाजांसाठी उत्तम मानले जाते. चालू हंगामात या मैदानावर एक सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये फलंदाज पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकमेव सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 धावांचा टप्पा ओलांडला होता. आजच्या सामन्यातही खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते, परिणामी चाहते उच्च धावसंख्येचा सामना पाहू शकतात.

आतापर्यंत कोलकाता आणि लखनौ हे दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसले आहेत. मात्र केकेआरचा फॉर्म लखनौपेक्षा चांगला राहिला आहे. कोलकाताने आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना चांगलेच हैराण केले आहे. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात केकेआर संघ वर्चस्व गाजवेल.

IPL 2024 KKR vs LSG l दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार : 

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य शिलेदार :

सुनील नारायण, फिल सॉल्ट, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, नितीश राणा/व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा/वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

लखनौ सुपर जायंट्सचे संभाव्य शिलेदार :

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, अर्शद खान, नवीन-उल-हक/शमर जोसेफ, यश ठाकूर.

News Title – IPL 2024 KKR vs LSG

महत्त्वाच्या बातम्या-

आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार लढत!

भाजपचं मोठं आश्वासन! आता घरोघरी मिळणार ही सुविधा

प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now