आयपीएल सुरू होण्याआधीच CSK ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू गंभीर जखमी

On: February 19, 2024 11:17 AM
LIC CSK Investment
---Advertisement---

IPL 2024 | आयपीएल सुरू होण्याआधी देशामध्ये लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलची सुरूवात कधी होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. आयपीएल सुरू होण्याआधीच यंदाच्या आयपीएल 2024 (IPL 2024) ची सर्वत्र चर्चा आहे. आता चेन्नई सुपरकिंग्ज संघाला मोठा झटका बसला आहे. सीएसके संघाच्या खेळाडूबद्दल वाईट बातमी समोर अली आहे.

आयपीएल हा क्रिकेट विश्वातील सर्व भारतीयांसाठी सण आहे. या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघ मोठा संघ आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात दिग्गजांसह या संघाने आपली कामगिरी केली आहे. मात्र आता या संघामधून वाईट बातमी समोर आली आहे. पाचवे जेतेपद पटकावलेल्या सीएसके संघात नवख्या खेळाडूला मोठी दुखापत झाली आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून मुस्ताफिजुर रहमान आहे. (IPL 2024)

मुस्ताफिजुर रहमानला दुखापत

मुस्ताफिजुरला दुखापत झाल्याचं कारण आता समोर आलं आहे. लिटन दासने मारलेला चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत इतकी जबर होती की खेळाडूला रक्तस्त्राव झाला होता. यामुळे खेळाडू रक्तबंबाळ झाला होता. त्यानंतर मुस्ताफिजुरला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सरावावेळी त्याला दुखापत झाली. सीटी स्कॅनमध्ये कोणतीही अंतर्गत दुखापत दिसली नाही. (IPL 2024)

सीएसके पाच वेळा जेतेपद

सीएसकेमध्ये येत्या काळामध्ये आधीच दोन विदेशी वेगवान गोलंदाज आहेत. त्यातील मुस्ताफिजुर रहमान एक आहे. तो लवकरात लवकर आयपीएल खेळासाठी बरा व्हावा अशी संघव्यवस्थापनेची आहे.

सीएसके हा संघ गेली अनेक वर्षांपासून महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. यामध्ये पाच वेळा या संघाने जेतेपद मिळवलं आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध सीएसके यासंघांमध्ये अनेकदा चुरसीची लढाई होताना दिसली आहे. हे दोन्ही परस्परविरोधी खेळताना चाहत्यांचं लक्ष लागलेलं असायचं.

यंदाच्या आयपीएलने अनेक वळणं घेतली आहेत. ही आयपीएल सुरू होण्याआधीच अधिक चर्चेत आहे. देशी-विदेशी खेळाडूंचा लिलाव देखील झाला आणि यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या घटनेने सुरू होणाऱ्या आयपीएलने वेगळं वळण घेतलं आहे.

News Title – IPL 2024 CSK mustafizur rehman news Update

महत्त्वाच्या बातम्या

टाटा समूहाला ‘देव’ पावणार? वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत कमाईची ‘भारी’ योजना

OUT अन् 20 मिनिटांनी NOT OUT; रहाणेसोबत काय घडलं? प्रथमच झालं असं, कोचनं मागितली माफी

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

Join WhatsApp Group

Join Now