IPL 2024 Auction | बेंगलोरनं सोडल्यानं होता परेशान, पंजाबनं लावलेली बोली ऐकून उडाले होश!

On: December 19, 2023 3:58 PM
IPL 2024 Auction
---Advertisement---

IPL 2024 Auction | हर्षल पटेल (Harshal Patel) आता आयपीएल 2024 च्या हंगामात पंजाब किंग्जच्या जर्सीत दिसणार आहे. पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपयात हर्षल पटेलचा संघात घेतलं आहे. तर हर्षल पटेलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पंजाब किंग्ज व्यतिरिक्त गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने हर्षल पटेलसाठी बोली लावली, पण शेवटची बोली पंजाब किंग्जने जिंकली.

IPL 2024 Auction | हर्षल पटेल दिसणार पंजाब किंग्जच्या जर्सीत

या लिलावात (IPL 2024 Auction) गुजरात टायटन्सने हर्षल पटेलसाठी पहिली बोली लावली. हर्षल पटेलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. यानंतर पंजाब किंग्सचा प्रवेश झाला. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सने बोली सुरूच ठेवली.

 IPL 2024 Auction | पंजाबने हर्षलला 11.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं

जेव्हा हर्षल पटेलची किंमत 11 कोटी रुपयांवर पोहोचली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सने प्रवेश केला, परंतु या संघाने लवकरच स्वतःला बाजूला केलं अशाप्रकारे पंजाब किंग्जने हर्षल पटेलसाठी शेवटची बोली लावली. पंजाब किंग्सने हर्षल पटेलला 11.75 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलं.

हर्षल पटेलला आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. तो 2012 सालापासून आयपीएलचा भाग आहे. त्याने 11 हंगाम खेळले आहेत. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये 91 सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Amitabh Bachchan यांनी अखेर सांगून टाकलं… म्हणाले, “हाच माझा खरा वारसदार!”

IPL Auction 2024 | ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या Pat Cumminsवर पैशांचा पाऊस, बोली थांबता थांबेना… शेवटी

IPL Auction 2024 | वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला नडला, आता भारतानंच केलं मालामाल

IPL Auction 2024 | रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात, मोजले ‘इतके’ कोटी रुपये

Indian Premier League | Rovman Powell वर लागली पहिली बोली, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now