iPhone 15 | भारतात आयफोन खरेदीची क्रेझ सातत्याने वाढत आहे. बरेच लोक Android फोन सोडून आयफोनकडे वळत आहेत. ऍपलने गेल्या वर्षी आयफोनची नवीनतम मालिका – आयफोन 15 लाँच केली. जर तुम्हाला फोनच्या या सीरीजचा फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला चांगली ऑफर मिळत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर iPhone 15 खरेदीवर सुमारे 12 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे.
आयफोन 15 झाला स्वस्त
iPhone 15 खरेदी करण्यासाठी तुम्ही Flipkart ची ऑफर पाहू शकता. ऑनलाईन खरेदी करणार असाल तर तुम्हाला 11,901 रुपयांची सूट मिळत आहे. तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह अतिरिक्त बचत देखील करू शकता. एकूणच, फ्लिपकार्टच्या सर्व ऑफर्सचा फायदा घेऊन, तुम्ही अनेक हजार रुपये वाचवाल.
Apple iPhone 15 च्या 128GB मॉडेलची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. हे मॉडेल फ्लिपकार्टवर 65,999 रुपयांना उपलब्ध आहे. iPhone 15 11,901 रुपयांच्या सवलतीने खरेदी करता येईल. अधिक बचत करण्यासाठी बँकेच्या ऑफरचाही फायदा घेतला जाऊ शकतो. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे 1,000 रुपये स्वतंत्रपणे वाचवले जाऊ शकतात.
iPhone 15 | फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर
फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्द्ध आहे. तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन देऊन iPhone 15 खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 54,990 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
एक्सचेंज ऑफर अंतर्गत ही सूट तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून आहे. जर तुम्ही पूर्ण लाभ घेण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला 54,990 रुपयांचा जास्तीत जास्त फायदा मिळेल.
iPhone 15 (128GB) मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. कॅमेरा वैशिष्ट्ये म्हणून, 48MP + 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 12MP फ्रंट कॅमेरा आहे. या हँडसेटला A16 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट आहे. पॉवर बॅकअप म्हणून 3349 mAh बॅटरी दिली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG | रोहित शर्मा चांगलाच भडकला, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
Shreyas Talpade | ‘या’ कारणामुळे श्रेयसने सर्वांपासून मोठी गोष्ट लपवली!
Ayesha Khan | “त्यांनी मला पहिल्या मजल्यावर नेलं आणि…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार
Bihar Politics | मोठी बातमी! नितीश कुमार यांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ








