Infinix Smartphone l Infinix कंपनीने कमी बजेटमधील स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. या सीरिजला Infinix Note 40 Pro 5G असे नाव दिले आहे. या मालिकेअंतर्गत कंपनीने भारतात Infinix Note 40 Pro 5G आणि Infinix Note 40 Pro Plus 5G असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.
दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स काय आहेत? :
Infinix कंपनीने हे दोन्ही फोन जागतिक बाजारात लाँच केले आहेत. कंपनीने या दोन्ही फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेट, 108MP बॅक कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 6.78 इंच फुल एचडी प्लस वक्र AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 1300 nits पीक ब्राइटनेस, 2160Hz PWM डिमिंग आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससह येत आहे.
या दोन्ही फोनमध्ये प्रोसेसरसाठी 6nm MediaTek Dimensity 7020 चिपसेट आहे, जो ग्राफिक्ससाठी IMG BXM-8-256 GPU सह येत आहे. हा फोन Android 14 वर आधारित XOS 14 वर चालतो. Infinix Note 40 Pro+ 5G मध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येत आहे. तसेच
Infinix Note 40 Pro 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येत आहे.
Infinix Smartphone l कॅमेरा फीचर्स काय आहेत? :
– या दोन्ही फोनच्या मागील बाजूस एलईडी लाईटसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
– बॅक पॅनलमध्ये 108MP मुख्य कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, जो f/1.75 अपर्चर आणि OIS सपोर्टसह येतो.
– या दोन्ही फोनचा दुसरा बॅक कॅमेरा 2MP मॅक्रो लेन्ससह येत, तर तिसरा कॅमेरा 2MP डेप्थ सेन्सरसह येत आहे.
– या दोन्ही फोनचा बॅक कॅमेरा 2K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
– तसेच या या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे, जो f/2.2 अपर्चरसह येत आहे.
किंमत किती असणार? :
– Infinix Note 40 Pro 5G ची किंमत 21,999 रुपये आहे. या किमतीत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट उपलब्ध आहे.
– Infinix Note 40 Pro+ 5G ची किंमत 24,999 रुपये आहे. या किमतीत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट उपलब्ध आहे.
News Title : Infinix Note 40 Pro 5G Series Launched
महत्त्वाच्या बातम्या :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! JEE 2024 च्या वेळापत्रकात बदल, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ
भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?
राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना






