अहमदनगर | प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Maharaj Indurikar) यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी उद्यापासून 5 दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इंदुरीकर महाराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांचे उद्यापासून ते पाच दिवसापर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.
मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे. या सगळ्या पार्शभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होत आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती घोषणा करणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






