IndiGo Bomb Threat | नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी मोठी खळबळ उडाली. कोच्चीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आल्यानंतर या विमानाचं नागपूरमध्ये तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. घटनेनंतर काही काळ विमानतळावर एकच गोंधळ आणि पळापळ झाली.
सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून विमानाची तपासणी सुरू असून, अद्याप कोणतीही स्फोटके किंवा धोकादायक वस्तू सापडलेली नाही.
विमानात सापडला बॉम्ब? प्रवाशांना तातडीने बाहेर काढलं :
ही घटना सकाळी 12 वाजताच्या सुमारास घडली. इंडिगोचं फ्लाइट 6E-2211 सकाळी 9.20 ला कोचीहून निघालं होतं आणि दुपारी 12.35 ला दिल्लीला पोहोचणार होतं. मात्र, प्रवासादरम्यान विमानातील अधिकाऱ्यांना बॉम्ब ठेवण्यात आल्याचा इशारा मिळाला.
त्यानंतर आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार विमानाचं नागपूरमध्ये लँडिंग करण्यात आलं. प्रवाशांना तातडीने विमानातून खाली उतरवण्यात आलं आणि बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी सुरू करण्यात आली. सध्या याप्रकरणात पोलीस कोणताही धोका नाकारत नाहीत, परंतु प्राथमिक तपासात स्फोटक सापडलेले नाही.
IndiGo Bomb Threat | नागपूर विमानतळाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह :
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. विमानतळाच्या 25 किमी परिघात 181 अनधिकृत उंच इमारती सापडल्या आहेत ज्या विमानाच्या उड्डाणासाठी धोका ठरू शकतात.
विमानतळ प्रशासनाला याची कल्पना असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा अपघातांपासून विमानतळ सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक प्रभावी पावलं उचलण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.






