विमान प्रवाशांना मोठा झटका! इंडिगोने तिकीट दरात केली भरमसाठ वाढ

On: March 14, 2026 2:56 PM
Flight ticket price hike
---Advertisement---

Flight ticket price hike | भारतामध्ये हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे प्रमुख एअरलाईन कंपन्यांनी तिकीट दरांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. इंडिगोने 14 मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी फ्यूल सरचार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांना आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

इंधन दरवाढीचा तिकीटांवर परिणाम :

भारताची मोठी विमान कंपनी इंडिगो (IndiGo) ने 14 मार्चपासून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अतिरिक्त फ्यूल सरचार्ज आकारण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार हा अतिरिक्त शुल्क किमान 425 रुपये ते कमाल 2,300 रुपये दरम्यान असणार आहे. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्यूलच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

एअरलाईन उद्योगात एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (Aviation Turbine Fuel) हा ऑपरेशनल खर्चातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. एअरलाईन्सच्या एकूण खर्चापैकी जवळपास 40 टक्के हिस्सा या इंधनाचा असतो. मार्च 2026 च्या सुरुवातीपासून जेट इंधनाच्या किमती सातत्याने वाढताना दिसत असल्याने विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तिकीट दरांमध्ये वाढ करणे किंवा फ्यूल सरचार्ज लागू करणे हा पर्याय कंपन्यांसमोर उरला असल्याचे सांगितले जात आहे. (Flight ticket price hike)

Flight ticket price hike | इतर एअरलाईन्सही विचारात :

इंडिगोच्या निर्णयानंतर भारतातील इतर विमान कंपन्याही अशाच पद्धतीने अतिरिक्त शुल्क लागू करण्याचा विचार करत आहेत. स्पाइसजेट (SpiceJet) आणि अकासा एअर (Akasa Air) या कंपन्यांकडून तिकिटांवर फ्यूल सरचार्ज लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) यांनीही विमान तिकिटांवर अशाच प्रकारचे अतिरिक्त शुल्क लागू केले होते.

दरम्यान, जागतिक तेल बाजारातील घडामोडींमुळे विमान इंधनाच्या किमतींवर दबाव वाढला आहे. मध्य पूर्व (Middle East) परिसरात वाढत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुज (Strait of Hormuz) या महत्त्वाच्या समुद्री मार्गाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे तेल बाजार अस्थिर झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत कमी झाल्याने एअरलाईन कंपन्यांवर आर्थिक ताण आणखी वाढला आहे. (Flight ticket price hike)

याशिवाय फ्यूल सरचार्ज लागू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. पहिला टप्पा 12 मार्चपासून सुरू झाला असून यात देशांतर्गत उड्डाणे आणि सार्क देशांकडे जाणाऱ्या प्रवासावर अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. दुसरा टप्पा 18 मार्चपासून लागू होणार असून यामध्ये युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडे जाणाऱ्या उड्डाणांवर अधिक फ्यूल सरचार्ज आकारला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्याबाबत अद्याप अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र त्यात हॉंगकॉंग, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या फार ईस्ट बाजारातील उड्डाणांचा समावेश असणार आहे.

News title : IndiGo Adds Fuel Surcharge On Tickets

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now