Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!

On: January 19, 2024 12:05 PM
Indian Women Hockey Match
---Advertisement---

Indian Women Hockey Match l कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. मात्र काही दिवसांपूर्वी धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. महेंद्रसिंग धोनी हा (MS Dhoni) अगदीकमी वेळा सामन्या व्यतिरिक्त स्टेडियमवर गेलेला पाहायला मिळतो. अशातच आता एम एस धोनी एका स्टेडियमवर सामना पाहायला गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

Indian Women Hockey Match l टीम इंडियाचा पराभव झाल्याने धोनी निराश :

मात्र यावेळी धोनी हा (MS Dhoni) क्रिकेट सामन्याच्या स्टेडियम न जात हॉकीच्या स्टेडिअमवर पाहायला मिळत आहे. FIH ऑलिम्पिक पात्रता सामने धोनीच्या घरच्या मैदानात म्हणजेच रांची येथे खेळवले जात आहेत. काल या सामन्याच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाचा सामना जर्मनीशी झाला. मात्र यावेळी सामन्यात भारतीय संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला. यामुळे या रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने धोनी निराश झाल्याचे दिसले आहे.

या स्पर्धेतील टॉप-3 मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना ऑलिम्पिकसाठी तिकीटे मिळणार आहेत. जर्मनीकडून झालेल्या पराभवामुळे भारताला धक्का बसला असला तरी ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची आणखी एक संधी आहे. शुक्रवारी म्हणजेच आज तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठी भारताचा सामना जपानशी होणार असून हा सामना जिंकून भारतीय महिला संघाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळू शकते आहे.

टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी धोनी थेट स्टेडिअमवर (Indian Women Hockey Match) :

महत्वाचा मानला जाणारा भारतीय संघाचा हा सामना रांची येथे खेळवले जात होता. मात्र या सामन्यादरम्यान भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. मात्र यावेळी सामना पाहण्यासाठी आलेला क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्टेडियमवर आला होता.

त्यावेळी टीम इंडियाचे चाहत्यांमध्ये उत्सवाचाही वातावरण पसरले होते. यावेळी हा सामना खूपच रोमांचक झाला आहे. कारण निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत संपला आणि त्यानंतर पेनल्टी शूट-आऊटमध्ये भारतीय संघ केवळ एका गोलने मागे पडला आणि (Indian Women Hockey Match) जर्मनीने 4-3 ने विजय मिळवला आहे.

टीम इंडियाचा पराभव पाहून धोनी नक्कीच निराश झाला असेल पण असा रोमांचक सामना पाहण्याचा आनंद त्याला नक्कीच आला असेल.

News Title : Indian Women Hockey Match

महत्त्वाच्या बातम्या –

MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी

Pakistan Targeted Militant Targets In Iran l या देशाने केला पाकिस्तानवर हल्ला

Solapur Labor Colony Opening l आज हजारो कामगारांना मिळणार हक्काचं घर! देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे उदघाटन

Ram Mandir साठी महिन्याला 2 कोटी रुपयांची देणगी; ट्रस्टने मागवल्या ‘या’ गोष्टी

Ram Mandir Live Telecast l 22 जानेवारीला घरबसल्या पाहू शकता राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now