Indian Police Force Trailer l ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसिरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलर आऊट

On: January 6, 2024 6:58 AM
Indian Police Force Trailer
---Advertisement---

Indian Police Force Trailer l आजकाल घरबसल्या चित्रपट, वेबसिरीज पाहायला प्रेक्षक जास्त पसंती देतात. त्यामुळे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिरीज पाहायला जास्त प्राधान्य देतात. अशातच रोहित शेट्टीची बहुचर्चित वेबसीरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना इंडियन पोलिस फोर्स ही वेबसिरीज लवकरच घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

Indian Police Force Trailer : 

इंडियन पोलिस फोर्स या वेबसी या वेबसिरीजचा ट्रेलर अवघ्या 3 मिनिटे आणि 2 सेकंदाचा आहे. मात्र या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित इंडियन पोलिस फोर्स या वेबसिरीजची कथा तीन पोलीस मित्रांसंदर्भात आहे. तसेच या सिरीजमध्ये दिल्लीतील 3 पोलिसांची वेगळीच गोष्ट दाखवली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. जो दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या मोहिमेत सिद्धार्थ मल्होत्राचे नेतृत्व करत आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रादेखील पोलिसांच्या गणवेशात अतिशय दमदार दिसत आहे. या मालिकेत विवेक ओबेरॉय देखील खूप चांगल्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय देखील या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या वेबसिरीजचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा हा अभिनेत्री ईशा तलवारची रोमँटिक केमिस्ट्री दिसणार :

Indian Police Force Trailer l इंडियन पोलिस फोर्स या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा अभिनेत्री ईशा तलवारसोबत रोमान्स करणार आहे. चाहत्यांनाही दोघांची रोमँटिक केमिस्ट्री खूप आवडत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ पोलिस फोर्सच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरला अवघ्या एका तासात 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी ट्रेलरला डोक्यावर घेतले आहे.

Indian Police Force Trailer l जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार वेबसिरीज :

सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत असलेली वेबसिरीज 19 जानेवारीला अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लँटफॉर्मवर रिलीज होणार आहे. विवेक ओबेरॉयशिवाय शरद केळकर, निकितिन धीर, श्वेता तिवारी असे अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. त्यामुळेच या मालिकेच्या प्रदर्शनासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now