बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार? इंडियन बँकेत भरती प्रक्रिया सुरु

On: March 14, 2024 12:29 PM
Indian Bank Recruitment 2024
---Advertisement---

Indian Bank Recruitment 2024 l देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या इंडियन बँकेने विविध विभागांमध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रेडिट, एनआर बिझनेस रिलेशनशिप, सिक्युरिटी, एमएसएमई, डिजिटल मार्केटिंग, एसइओ, सोशल मीडिया, फॉरेक्स या विभागांमध्ये एकूण 146 विशेषज्ञ अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

Indian Bank Recruitment 2024 l इच्छुक उमेदवार या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात :

अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत माहितीसह लॉग इन करून, उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील. तसेच इच्छुक उमेदवार 1 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतील.

अर्ज शुल्क किती असणार? :

इंडियन बँक स्पेशलिस्ट ऑफिसर भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 175 रुपये आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती अधिसूचनेतील पदांसाठी बँकेने सादर केलेले पात्रता व अटी काळजीपूर्वक वाचावे.

शैक्षणिक पात्रता काय हवी : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच Graduate Degree / B.E / B.Tech / CA / MBA/ ICWA / CFA / PG पदवी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा : इंडियन बँकेने जारी केलेल्या सुचनेनुसार विशेषज्ञ अधिकारी (SO) या पदांसाठी पात्र उमेदवाराचे वय 22 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.

Indian Bank Recruitment 2024 l अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :

– अर्ज करण्यासाठी सर्वात indianbank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– त्यानंतर होम पेजवर असलेल्या भरती लिंकवर क्लिक करा.
– तेथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
– त्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
– अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाइन भरावी लागेल.
– अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्याकडे ठेवा.

News Title : Indian Bank Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपमुळे अजित पवारांचं टेंशन वाढलं? ; ‘हा’ नेता शरद पवार गटात जाणार?

नाशिकमध्ये उमेदवार राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा तो साउथ सिनेमा आता या दिवशी OTT वर येतोय?

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now