भारतीय लष्कराला मोठे यश; पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना घेरले, गोळीबार सुरु

On: April 29, 2025 10:55 AM
Pahalgam Attack
---Advertisement---

Pahalgam Attack | २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Attack) भारतीय लष्कराने मोठे यश मिळवले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या सहा दहशतवाद्यांना लष्कराने शोधून काढत चारही बाजूंनी घेरले आहे. सध्या या दहशतवाद्यांशी जंगलात चकमक सुरु असून, घटनास्थळी जोरदार गोळीबार सुरु असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांकडून व्यापक शोध मोहिम राबवली जात होती. डोंगराळ भागात लपलेले दहशतवादी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती.

चीन बनावटीचा सॅटेलाइट फोन आणि दहशतवाद्यांशी गोळीबार :

भारतीय जवानांनी (Indian Army) मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडे चीनी बनावटीचा सॅटेलाइट फोन होता. हे दहशतवादी डोंगराळ भागातून पायदळाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरकडे निघाले होते. परंतु भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि बीएसएफने मिळून त्यांना अडवले आणि चारही बाजूंनी घेरले. (Pahalgam Attack)

सध्या सुरू असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबार सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत सतर्कता पाळली जात आहे.

Pahalgam Attack | हाशिम मूसा आणि लश्कर-ए-तैयबा कनेक्शन :

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या कटात दहशतवादी हाशिम मूसा याचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. मूसा हा पाकिस्तानचा नागरिक असून, तो पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुपचा माजी कमांडो आहे आणि सध्या लश्कर-ए-तैयबामध्ये सक्रीय आहे. (Pahalgam Attack)

भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांचा मक्ता संपवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. पुढील काही तासांत संपूर्ण ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Newsh Title: Indian Army Corners All Pahalgam Attack Terrorists; Gunfight Underway in Kashmir

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now