मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल- मुरलीधर मोहोळ

On: April 30, 2024 2:40 PM
Pune loksabha 2024
---Advertisement---

पुणे | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune loksabha 2024) निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहोळांसाठी भाजपकडून शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. अशात पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आलेला. या मेळाव्याला संबोधित करताना भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

2027 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील  मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी व्यक्त केला आहे. पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात मोहोळ बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असंही मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी यावेळी बोलताना म्हटलंय.

मोदी सरकारच्या दशकात झालेली विदेशी गुंतवणूक दुपटीहून अधिक वाढून 640 अब्ज डॉलर्सवर गेली. 2014 पर्यंत देशात केवळ 500 स्टार्टअप्स होते, गेल्या दहा वर्षांत ती संख्या एक लाख 16 हजार इतकी झाली, असं मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं.

मोहोळ पुढे म्हणाले, पुणे व्यापाराचे केंद्र होण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, शहराच्या बाहेर मोठे व्यवसायिक केंद्र उभारणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्वेंशन सेंटर विकसित करणे आणि व्यापाऱ्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; किंमत ऐकून वेडे व्हाल

“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; राऊतांचा मोदींवर पलटवार

ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा!

प्रसिद्ध अभिनेत्रीचा शरद पवार गटात प्रवेश, पहिल्याच भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल

पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now