पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनने कोणावर फोडलं खापर? वाचा आगाची धक्कादायक प्रतिक्रिया

On: February 16, 2026 11:31 AM
IND vs PAK (2)
---Advertisement---

IND vs PAK | टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत ६१ धावांनी विजय मिळवला. धावांच्या फरकाच्या दृष्टीने पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला. या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधाराने संघाच्या कामगिरीबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

कोलंबोतील सामन्यात भारताची सरशी :

ग्रुप स्टेजमधील हा बहुचर्चित सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडला; मात्र भारताने २० षटकांत १७५ धावांची भक्कम मजल मारत प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. (IND vs PAK News)

१७६ धावांच्या पाठलागासाठी उतरलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांतच ११४ धावांवर गुंडाळला गेला. सुरुवातीलाच फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्याने संघावर दबाव वाढला. पॉवरप्लेमध्येच चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यामुळे धावसंख्या अवघ्या ३८ वर पोहोचली होती. उस्मान खानने सर्वाधिक ४४ धावा करत थोडा प्रतिकार केला, मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. परिणामी भारताने तब्बल ६१ धावांनी विजय मिळवत सुपर ८ फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

IND vs PAK | पराभवानंतर सलमान आगाची प्रतिक्रिया :

मोठ्या फरकाने झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा (Salman Agha) पत्रकार परिषदेत बोलताना संघातील उणिवांवर प्रकाश टाकला. त्याने स्पष्टपणे सांगितले की संघाचे फिरकीपटू अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकू शकले नाहीत. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी चांगली कामगिरी केली असली तरी या सामन्यात त्यांचा दिवस नव्हता, असे तो म्हणाला. तसेच पॉवरप्लेमध्ये सलग विकेट्स पडणे हा सामन्याचा निर्णायक टप्पा ठरल्याचेही त्याने नमूद केले. (IND vs PAK News)

खेळपट्टीबाबतही त्याने निरीक्षण नोंदवले. पहिल्या डावात पिच थोडे चिकट वाटत होते आणि चेंडूला पकड मिळत होती, असे त्याने सांगितले. मात्र दुसऱ्या डावात खेळपट्टीची स्थिती तुलनेने सुधारली होती, असेही त्याने स्पष्ट केले. अशा मोठ्या सामन्यांमध्ये भावना तीव्र असतात, परंतु संघाला त्याचा सामना करण्याचा अनुभव असल्याचे तो म्हणाला. पुढील दोन दिवसांत होणारा सामना सुपर ८ मध्ये प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने संघाने आता त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले.

News title : India Thrash Pakistan by 61 Runs

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now