पाकिस्तानात मोठी खळबळ! भारताने घेतला सर्वात मोठा निर्णय

On: February 17, 2026 3:57 PM
India Pakistan Tension (1)
---Advertisement---

India Pakistan Tension | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे शेजारी देशात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अलीकडील दहशतवादी घटनेनंतर भारताने केवळ राजनैतिक पातळीवरच नव्हे, तर जलव्यवस्थापनाच्या बाबतीतही ठोस पावले उचलली आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम पाकिस्तानवर होताना दिसत आहे. (India Pakistan Tension News)

पहलगाम हल्ल्यानंतर कठोर भूमिका :

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अनेक वर्षांपासून ताणलेले आहेत. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी घुसखोरी होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्याने देश हादरला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत 26 जणांचा बळी घेतला. या घटनेत हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना ‘कलमा’ पठण करण्यास सांगितले आणि ज्यांना ते म्हणता आले नाही त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याचे काही व्हिडिओ पुढे आल्यानंतर देशभर संताप उसळला.

या घटनेमागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचा प्रवाह रोखण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भारताला हा करार एकतर्फी मोडता येणार नाही, असा दावा पाकिस्तानने केला असला तरी भारताने आपली भूमिका कायम ठेवली.

India Pakistan Tension | रावी नदीवरील धरण अंतिम टप्प्यात :

सिंधू जल कराराच्या निर्णयानंतर भारताने रावी नदीवरील प्रकल्पांना गती दिली आहे. रावी नदीवर उभारण्यात येत असलेले शाहपूर कांडी धरण (Shahpur Kandi Dam) आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. हे धरण पूर्ण झाल्यानंतर भारतातून रावीचे पाणी पाकिस्तानकडे जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून 31 मार्चपर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मंत्री जावेद अहमद राणा (Javed Ahmed Rana) यांनी दिली आहे.

रावी नदीच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे; मात्र आतापर्यंत धरणाची सुविधा नसल्यामुळे पाणी पाकिस्तानमध्ये वाहत होते. धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती बदलणार आहे. पाकिस्तानातील अनेक भाग रावीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने या निर्णयामुळे तेथे चिंता व्यक्त केली जात आहे. भारताच्या या पावलामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News title : India Suspends Indus Treaty; Ravi Dam Near Completion

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now