सलमान खानच्या वडिलांची तब्येत बिघडली; ICU मध्ये दाखल

On: February 17, 2026 2:38 PM
Salim Khan Hospitalised
---Advertisement---

Salim Khan Hospitalised | ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलांची तब्येत खालावल्याची माहिती मिळताच अभिनेता सलमान खान तातडीने रुग्णालयात पोहोचल्याचे समोर आले आहे.

लीलावती रुग्णालयात उपचार सुरू :

बॉलिवूडमधील दिग्गज लेखक सलीम खान (Salim Khan) यांना प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (Lilavati Hospital and Research Centre) येथे दाखल करण्यात आले. त्यांचे ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटजवळच हे रुग्णालय असल्याने तातडीने उपचारासाठी त्यांना हलवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले असून सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांना नेमका कोणता त्रास झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. सलमान खान (Salman Khan) स्वतः रुग्णालयात पोहोचल्याचेही पाहायला मिळाले आणि त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट जाणवत होती. कुटुंबीयांकडून प्रकृतीविषयी अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.

Salim Khan Hospitalised | सलीम-जावेदची गाजलेली जोडी :

सलीम खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे पटकथालेखक म्हणून ओळखले जातात. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यासोबतची त्यांची ‘सलीम-जावेद’ ही जोडी विशेष प्रसिद्ध होती. नुकताच त्यांनी लग्नाचा 61 वा वाढदिवस साजरा केला होता. 1964 मध्ये त्यांनी सलमा यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला सलमान, अरबाज, सोहैल आणि अलवीरा अशी चार अपत्ये आहेत.

यानंतर 1981 मध्ये त्यांनी अभिनेत्री हेलन (Helen) यांच्याशी दुसरे लग्न केले आणि अर्पिता हिला दत्तक घेतले. 24 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी 90 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच दिवशी त्यांचे जिवलग मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे निधन झाले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळण्याची चाहत्यांकडून उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

News title : Salim Khan Hospitalised; Salman Rushes In

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now