पाकिस्तानने दिल्लीतील ‘या’ भागात मिसाइल हल्ला केला!

On: May 10, 2025 9:37 AM
Delhi Missile Attack
---Advertisement---

Delhi Missile Attack | भारत-पाकिस्तान (Ind Vs Pak) सीमेवर गेले काही दिवस तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर हल्ल्याचे प्रयत्न सुरु असून, शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी विविध ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय सशस्त्र दलांनी ही सर्व हरकत निष्फळ ठरवली.

दिल्लीपासून ३०० किमी अंतरावर फतेह-1 क्षेपणास्त्र पाडलं :

शनिवारी पहाटे पाकिस्तानकडून राजधानी दिल्लीवर (Delhi Attack) हल्ला करण्याचा घातक डाव आखण्यात आला होता. पाकिस्तानने त्यांचं ‘फतेह-1’ हे घातक क्षेपणास्त्र दिल्लीच्या दिशेने सोडलं होतं. परंतु भारतीय सशस्त्र दलांच्या सतर्कतेमुळे हे मिसाइल दिल्लीपासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरच पाडण्यात यश आलं. सिरसा परिसरात भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने या मिसाइलला इंटरसेप्ट केलं. (Delhi Missile Attack)

फक्त दिल्लीच नव्हे, तर पाकिस्तानकडून अनेक सीमावर्ती ठिकाणीही हल्ल्याचे प्रयत्न सुरु आहेत. पठानकोट परिसरात ड्रोन एक्टिव्हिटी आढळून आली. हिमाचल प्रदेशातील माजरा गावाजवळ एक UAV (मानवरहीत विमान) पाडण्यात आलं.

Delhi Missile Attack | २६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न; भारताकडून सडेतोड उत्तर :

जम्मूमधील हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या ‘आप शंभू मंदिरा’ला टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे क्षेपणास्त्र मंदिराजवळ पडूनही कोणतीही हानी झाली नाही. पंजाबच्या अमृतसरमध्येही (amrutsar) पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी ठरला.

पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी एकूण २६ ठिकाणी ड्रोन आणि मिसाइलद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारताने प्रत्येक आक्रमणाला वेळेवर उत्तर दिलं. या कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तानचं एक फायटर जेटही पाडलं.

News Title: India-Pakistan Conflict: Pakistani Missile Intercepted 300 Km from Delhi – Major Attack Foiled

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now