App Ban | भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) एक कठोर निर्णय घेत, २५ मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये ULLU, ALTT, Big Shots, Desiflix, Boomex यांसारख्या लोकप्रिय पण वादग्रस्त अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सवर अश्लील, आक्षेपार्ह आणि अनसेन्सॉर कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप आहे.
सरकारने बॅन का केलं :
या अॅप्सकडून अश्लील वेब सिरीज व व्हिडीओ प्रकाशित केले जात होते. तसेच वयाची पडताळणी न करता अल्पवयीन यूजर्सना टार्गेट केलं जात होतं. याशिवाय IT Act 2000 आणि सायबर कायद्यांचं उल्लंघन केलं जात होतं व गोपनीयता व डेटा सुरक्षा नियम पाळले जात नव्हते.
या अॅप्समुळे समाजावर नकारात्मक मानसिक व नैतिक परिणाम होत असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
App Ban | सरकारने खालील अॅप्सवर बंदी घातली आहे:
ULLU, ALTT, Big Shots, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab, Kangan, Bull, Jalva, Wow Entertainment, Look Entertainment, Hit Prime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchal, MoodX, NeonX VIP, ShowHit, Fugi, Mojflix, Triflicks
अनेक OTT प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशिपशिवाय अश्लील कंटेंट सहज उपलब्ध होता. तरुण व लहान वयातील प्रेक्षकांमध्ये अशा सामग्रीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत होता, ज्यामुळे समाजात नैतिक अध:पतन होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.






