India terror alert | देशात सणासुदीच्या काळात सुरक्षा यंत्रणांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी नेपाळ मार्गे भारतात दाखल झाले आहेत. या तिघांचा फोटो आणि ओळख पटवणारी माहिती बिहार पोलिस मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (India terror alert)
या दहशतवाद्यांची नावे अशी आहेत :
मोहम्मद उस्मान (रहिवासी बहावलपुर, पाकिस्तान)
आदिल हुसैन (रहिवासी उमरकोट, पाकिस्तान)
हसनैन अली अवान (रहिवासी रावलपिंडी, पाकिस्तान)
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हे तिघे काठमांडूमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते बिहारमार्गे भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण आणि महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेले गणेशोत्सवाचे दिवस लक्षात घेता त्यांच्या हालचाली चिंताजनक ठरत आहेत.
India terror alert | सुरक्षा यंत्रणांचा शोध मोहीम :
या तिघा दहशतवाद्यांचा फोटो व्हायरल करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठेही हे दिसल्यास तातडीने संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. सध्या बिहारसह देशातील विविध भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. तपास यंत्रणांचे लक्ष या तिघांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यावर केंद्रीत आहे. (India terror alert)
पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून भरायच्या आहेत. त्यातच पुन्हा पाकिस्तानातून दहशतवादी घुसल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पहलगाम हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता.
नागरिकांना दिलेले आवाहन :
दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार केल्याच्या घटनांची आठवण अजूनही ताजी आहे. त्यामुळे यावेळी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. नेपाळ सीमेलगतच्या भागातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावी. (Nepal border terrorists)
भारताने पूर्वी ऑपरेशन सिंदूरसारख्या कारवायांद्वारे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र, पुन्हा नेपाळ मार्गे पाकिस्तानातील दहशतवादी भारतात आल्याने देशात खळबळ उडाली आहे.






