टीम इंडियाला मोठा धक्का! 2 दिग्गज खेळाडू संघातून बाहेर; BCCIनं आणला नवा हुकूमी एक्का

On: February 10, 2024 1:03 PM
IND vs ENG
---Advertisement---

IND vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG Test Series) उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचे (Team India) दोन दिग्गज खेळाडू अगोदरच मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भारताचा संघ कसा असणार?, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. बीसीसीआयने (BCCI) आता भरतीय संघाची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे टीम इंडियात एका नवीन चेहऱ्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवड समिती सदस्यांची काल (9 फेब्रुवारी) उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ निवडीबाबत बैठक घेण्यात आली होती. आज बीसीसीआयने ट्वीटरवर संघाची घोषणा केली आहे.

‘या’ खेळाडूला मिळाली संधी

बीसीसीआयने (IND vs ENG) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल(KL Rahul) यांचा संघात समावेश केला आहे. मात्र, मेडिकल टीमकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच त्यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात येईल, असेही बोर्डाने म्हटले आहे. BCCI ने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये आकाश दीपचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

पहिल्यांदाच बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला (Akash Deep In in Indian Cricket Team) टेस्ट टीममध्ये स्थान मिळाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये चौथा कसोटी सामना होणार आहे. तर, पाचवा आणि शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे होणार आहे.

‘हे’ दिग्गज खेळाडू बाहेर

इंग्लंडसोबतच्या (IND vs ENG ) उर्वरित तीन सामन्यात विराट कोहली खेळणार का? याची सर्वांना आशा लागली होती. मात्र, त्यावर आता पाणी फेरले आहे. विराट कोहली हा इंग्लंडविरुद्धच्या उरलेल्या कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने अनुपस्थितीबाबत संघ व्यवस्थापनाला व निवड समितीला कळवलं आहे. विराट कोहलीपाठोपाठ (Virat Kohli) भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हाही दुखापतीमुळे मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू संघात नसणार आहेत.

उर्वरित सामन्यांसाठी ‘असा’ असेल संघ

रोहित शर्मा-Rohit Sharma (IND vs ENG) (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल (फिटनेस), रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरैल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेस), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार और आकाश दीप.

News Title-  IND vs ENG Test Series Team India Announced Aakash Deep in the team

महत्त्वाच्या बातम्या –

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात

Join WhatsApp Group

Join Now