लखनऊ | IND vs ENG विराट कोहलीच्या रुपाने भारताला मोठा धक्का बसलाय. 9 चेंडूनंतर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. विश्वचषकात पहिल्यांदाच विराट कोहली शून्यावर बाद झाला आहे. शुभमन गिलच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला होता.
भारतीय क्रिकेट संघ 2023 च्या विश्वचषकात भलत्याच फाॅर्ममध्ये असल्याने आजपर्यंत कोणीही रोखू शकलेलं नाही. रोहित सेनेने आतापर्यंत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत.
आज टीम इंडियाचा सामना सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडशी लखनौच्या एकना स्टेडियमवर होत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच फलंदाजी करत आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथ म फलंदाजी करताना किती धावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






