IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

On: January 30, 2024 6:40 AM
IND vs ENG
---Advertisement---

IND vs ENG | भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले आहेत. लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे पुढचा सामना खेळू शकणार नाहीत. निवडकर्त्यांनी सर्फराज खान आणि वॉशिंग्टन सुंदरसह सौरभ कुमारचा त्यांच्या जागी संघात समावेश केला आहे. सौरभ या 30 वर्षीय खेळाडूला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणारा डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दमदार कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित केले. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने एकूण 5 बळी घेतले आणि भारत अ संघाला सामन्यात विजय मिळवून दिला. या 30 वर्षीय फिरकीपटूने 68 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 27 च्या सरासरीने 2061 धावा करताना 290 बळी पटकावले आहेत.

क्रिकेटसाठी सरकारी नोकरी सोडली

दरम्यान, सौरभ कुमारने उत्तर प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी हवाई दलाची नोकरी देखील सोडली. या खेळाडूने लष्कराच्या संघातूनच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सौरभ कुमारची हवाई दलात क्रीडा कोट्यातून निवड झाली होती. उत्तर प्रदेशच्या रणजी संघातून खेळण्याच्या इच्छेमुळे त्याने धाडसी निर्णय घेतला आणि हवाई दलाची नोकरी सोडली.

भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी खूप स्पर्धा असते. 30 व्या वर्षी टीम इंडियात पदार्पण करण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे ते मोठे आव्हानच. पण दिवंगत बिशनसिंग बेदी यांना आदर्श मानणाऱ्या सौरभने हार न मानता आपल्या स्वप्नाच्या दिशेने कूच केली. तो म्हणाला की, बिशन सर मला सांगत असत की मेहनत करत राहा आणि जेव्हाही संधी मिळेल तेव्हा आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याची मानसिक तयारी ठेवा. मी स्वतःला नेट किंवा गोलंदाजीपासून कधीच दूर ठेवत नाही.

 

IND vs ENG थरार

सौरभ कुमारला देशांतर्गत क्रिकेटमधील खूप अनुभव आहे. चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल यांसारख्या काही नामांकित खेळाडूंविरुद्ध गोलंदाजी करण्याचाही त्याला अनुभव आहे. सौरभने आता आपल्या फलंदाजीतही सुधारणा केली आहे आणि खालच्या क्रमवारीतही तो फलंदाजीत योगदान देऊ शकतो.

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान

News Title- Uttar Pradesh’s Saurabh Kumar has been named in Team India as Ravindra Jadeja’s replacement for the second Test against England

महत्त्वाच्या बातम्या –

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

Punjab | दारूचा घोट घेऊन स्टेअरिंग हाती घ्याल तर पोलिसांसोबत घरी जाल; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

PM मोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, Bollywood कलाकारांनाही पडली भुरळ

Kartik Aaryan | अभिनेता कार्तिक आर्यनला ‘ती’ गोष्ट पडली महागात; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now