IND vs AFG | पार्टी केल्यानं किशनची संघातून हकालपट्टी? भारतीय प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

On: January 11, 2024 10:25 AM
IND vs AFG
---Advertisement---

IND vs AFG | भारतीय संघ पुन्हा एकदा ट्वेंटी-20 क्रिकेटसाठी सज्ज झाला असून आजपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेला सुरूवात होत आहे. मोहाली येथे होणाऱ्या सलामीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच विराट कोहली त्याच्या वैयक्तिक कारणामुळं पहिला सामना खेळणार नसल्याचंही द्रविड यांनी सांगितलं. मात्र, संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनबद्दल मागील काही दिवसांपासून विचित्र बातम्या समोर येत आहेत. अशातच द्रविड यांनी याबद्दल मोठे विधान केलं.

मागील काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, इशान किशन आणि श्रेयस अय्यरला नियमांचं उल्लंघन केल्यामुळं संघाबाहेर करण्यात आलं. कारण किशननं अलीकडेच एका पार्टीला हजेरी लावली होती. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केलं आहे. या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं द्रविड यांनी स्पष्ट केलं.

इशान किशनबाबत राहुल द्रविड म्हणाले की, त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. इशानने विश्रांतीसाठी ब्रेक घेतला आहे. यामुळेच तो अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी उपलब्ध नाही. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नका.

IND vs AFG आजपासून थरार

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर इशान किशनची खूप चर्चा आहे. इशान किशननं आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बोर्डाकडून सुटीची परवानगी घेतली होती, मात्र तो दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध संघ जाहीर झाला तेव्हा त्याला स्थान मिळालं नाही. एकूणच किशन पार्टीत दिसल्यामुळं त्याला संघातून वगळल्याचं बोललं जात होतं. मात्र, द्रविड यांनी हे सर्वकाही खोटं असल्याचं सांगितलं.

इशाननं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच इशाननं कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली पण तो पार्टी करत असल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं बोललं जात होतं. पण राहुल द्रविड यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. आजपासून सुरू होत असलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतून टीम इंडिया 14 महिन्यांनंतर ट्वेंटी-20 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात दिसेल.

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, तिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मुकेश यादव, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

Ram Mandir Inauguration | राजकारण तापलं! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणावर काँग्रेस नेत्यांचं मोठं विधान

Ram Mandir Inauguration | राजकारणी किंवा उद्योगपती नाही! ‘या’ आध्यात्मिक गुरूनं राम मंदिरासाठी केलं सर्वाधिक दान

Mukesh Ambani | “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील”, अंबानींकडून मोदींचंही कौतुक

How To Increase Instagram Followers l इंस्टग्रामवर फॉलोवर्स वाढवायचेत? तर या ट्रिक्सचा करा वापर

IPO Investment l शेअर बाजारातील IPO मध्ये पैसे गुंतवण्याची किमान मर्यादा फक्त 15 हजार रुपयेचं का असते?

Join WhatsApp Group

Join Now