भाजप मंत्र्याच्या अडचणीत वाढ; लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा चर्चेत

On: December 6, 2022 7:05 PM
BJP
---Advertisement---

मुंबई | भाजपचे मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी या प्रकरणात गणेश नाईक यांना क्लिन चीट दिली होती.

ज्या महिलेच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ती महिला आता पुन्हा समोर आली असून त्या महिलेने गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मला माझ्या व्यवसायातून मिळणारे इन्कम (Income) बंद केले आहे. आम्ही जगायचं कसे? माझ्या मुलाला नाव द्यायला गणेश नाईक का घाबरत आहेत?. ते आम्हाला स्विकारात का नाहीत? असे अनेक प्रश्न त्या महिलेनं विचारले आहेत.

महिलेने अशी प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर त्या महिलेला काही प्रश्न विचारण्यात आले. कोर्टाने प्रकरण निकाली काढल्यानंतरही कोर्टात जाऊन न्याय न मागता पत्रकार परिषद घेऊन नाईक यांना बदनाम करण्याचा काम का करत आहेत. हा विरोधी पक्षाचा काही डाव आहे का?, असा सवाल त्या महिलेला केला.

मला कुणालाही बदनाम करायचं नाही आहे. गणेश नाईक यांनी माझ्या महिलेचा स्विकार करावा इतकीच अपेक्षा आहे. अशी मागणी त्या महिलेने केली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे मात्र गणेश नाईक यांचं मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक यांच्या परिचयाच्या एका महिलेने रिव्हाॅल्वर (Revolver) दाखवत धमकी देणं आणि बलात्कार केल्याचं दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याविषयी पुरावे मिळाले नसल्यामुळे गणेश नाईक यांची न्यायालयाने सुटका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now