निवडणुकीच्या निकालानंतर राऊतांचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

On: December 8, 2022 1:03 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज याचे निकाल जाहीर होत आहेत. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असून गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मात्र भाजप आणि काँग्रेस मध्ये टक्कर पहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस (Congress) आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या लढतीत आता आप पक्षाने देखील उडी घेतली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये आप पक्ष (AAP party) आपली कामगिरी दाखवू शकला नाही. मात्र गुजरातमध्ये थोड्या जागा मिळवण्यात आप पक्षाला यश आलं आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आप आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

यावेळी संजय राऊत गुजरात निकालाबाबत बोलताना म्हणाले, गुजरातमध्ये जो निकाल दिसतोय तो अपेक्षितच होता. तिकडे आप आणि इतर पक्षाने आघाडी केली असती तर काँटे की टक्कर पहायला मिळाली असती.

भाजप आणि आपमध्ये दिल्ली (Delhi) तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा, असं काही साटंलोटं झालं असावं अशी शंका आहे, असं म्हणत राऊतांनी आप आणि भाजपवर आरोप केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now