अजित पवारांच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती समोर!

On: October 29, 2023 5:45 PM
---Advertisement---

पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार सध्या कुठल्याच संस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितीत नव्हते. यामुळे ते नाराज असल्याचं बोललं गेलं. मात्र त्यांच्या अनउपस्थितीचं कारण अखेर समोर आलं. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस NCP) पक्षाचे नेते प्रफुल्ल (Praful Patel) पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देत या विषयाला पूर्णविराम दिला. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या आधिकृत X अकाउंटवर ट्विट करत या मागचं कारण सांगितलं.

प्रफ्फुल पटेल म्हणाले, अजित पवार यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाली आहे. कालपासून अजित पवारांना डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. ते बरे झाल्यानंतर पुन्हा जोमाने आपल्या कामाला लागतील.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now