Diabetes | डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

On: November 29, 2022 12:46 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | आजच्या काळात धकाधकीचं जीवन आणि बदलती जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. यासोबतच आहारात झालेल्या बदलांमुळे आपल्याला लठ्ठपणा, मधूमेह (Diabetes) यासारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यात डॉक्टरांच्या मते मधूमेह म्हणजे कधीच पूर्णपणे बरा न होणारा आजार. त्यामुळे आपल्याकडे डायबिटीज पेशंटच्या आहाराकडे विषेश लक्ष दिलं जातं.

मधूमेह रूग्णांनी (Diabetes Patient) साखर कमी खावी जास्त प्रमाणात फळांचं सेवन करावं असं आपण अनेकदा ऐकतो. मधूमेहींसाठी फळं कितीही चांगली असली तरी काही फळांचं मधूमेहींनी चुकूनही सेवन करू नये. ही काही फळं मधूमेहींच्या शरीरात अक्षरश: विषासारखं काम करतात.

आंबा (Mango) फळांचा राजा असला तरी तो डायबेटिस पेशंटसाठी खूप घातक आहे. आंब्यात साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेहींनी आंब्यांचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर त्यांना ह्रदयविकार किंवा पक्षाघाताचा सामना पण करावा लागू शकतो. आंब्याप्रमाणे द्राक्षे देखील अनेकांना आवडतात पण द्राक्षात साखरेचं प्रमाण अधिक असतं. जास्त प्रमाणात द्राक्षं खाल्ले तर मधुमेहींच्या शरीरातील ग्लुकोज वाढतं.

मधूमेहाच्या रूग्णांनी चिकू खाणं देखील टाळलं पाहिजे. चिकूमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. चिकूमधल्या या कॅलरीज (Calories) मधूमेह रूग्णांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात.

तुम्हाला मधूमेह असेल तर तुम्ही अननस खाणं टाळाच. कारण अननसात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण तर वाढतंच पण परिणामी साखरेची पातळी पण वाढतेच.

दरम्यान, तुम्ही मधूमेही असाल तर ही फळं किंवा या फळांचा ज्यूस पिणं देखील टाळा. याउलट तुम्ही योग्य आहार घ्या, नियमीत व्यायाम करा व फिरायला जा (Health Tips). जास्त वेळ उपाशी न राहणं, वेळेवर जेवण करणं, शिस्तबद्ध दिनचर्या ठेवणं या काही गोष्टींचं पालन केलं तर तुम्ही शुगर नियंत्रणात ठेऊ शकतात. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now