“2 कोटी घ्या, पण बाबांना परत आणा!”, वडिलांना गमावलेली लेक ‘एअर इंडिया’वर संतापली

On: June 13, 2025 5:17 PM
Ahmedabad Plane Crash Truth
---Advertisement---

Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद विमान अपघातात देशाने २४१ निष्पाप जीव गमावले आहेत. अशाच एका कुटुंबातील मुलगी फाल्गुनीने आपले वडील या दुर्घटनेत गमावले. रुग्णालयात वडिलांचा मृतदेह पाहून ती स्वतःला आवरू शकली नाही. “तुम्ही एक कोटी रुपये मदत देता आहात? मी तुम्हाला दोन कोटी देते… फक्त माझे वडील मला परत द्या” असा संतप्त आणि आर्त सवाल तिने थेट एअर इंडियाला केला. तिच्या अश्रूंनी उपस्थितांचंही काळीज हलवलं.

फाल्गुनीच्या बोलण्यात फक्त राग नव्हता, तर तिच्या दुःखात निघून गेलेल्या पित्याची ओढ, त्यांचं प्रेम, आणि एकटेपणाची धग होती. तिने स्पष्ट सांगितलं की, “पैशाने सर्व काही विकत घेता येतं, पण वडिलांचं प्रेम नाही. 1 कोटी नाही, 10 कोटी दिलेत तरीही त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही.” तिचे हे शब्द अनेकांच्या मनाला भिडले. (Ahmedabad Plane Crash)

“त्यांनी विमानात बसणं ही त्यांची चूक होती का?” :

मीडियाशी बोलताना फाल्गुनीने एक अत्यंत वेधक प्रश्न उपस्थित केला. “माझ्या वडिलांची चूक तरी काय होती? त्यांनी विमानात बसणं ही चूक होती का? एअर इंडियाला (Air India) काहीच उत्तर नाही, ना संवेदना!” हे प्रश्न केवळ तिचे नव्हते, तर अशा हजारो कुटुंबांचे प्रतिनिधीत्व करणारे होते, जे अशा दुर्दैवी दुर्घटनांनी उद्ध्वस्त झाले आहेत. (Ahmedabad Plane Crash)

ती पुढे म्हणाली, “त्या पैशांनी आम्ही नवीन बेड विकत घेऊ, पण त्यावर झोप येईल का? वडिलांनी जसं प्रेम दिलं, तसं प्रेम आता कुठं मिळेल?” या एका वाक्यातून तिच्या मनातील खोच, उपहास आणि असहायता साऱ्यांचा एकाच वेळी अनुभव येतो.

Ahmedabad Plane Crash | टाटा ग्रुपची मदत, पण शोक मोजण्यास अपुरी :

टाटा ग्रुपचे (TATA Group) प्रमुख एन. चंद्रशेखर यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी 1 कोटी रुपयांची मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने देखील आपल्या पत्रकातून दुःख व्यक्त केलं आहे. मात्र हे शब्द आणि रक्कम, गमावलेल्या माणसाच्या शून्यतेची भरपाई करू शकत नाहीत.

फाल्गुनीच्या प्रतिक्रिया ही केवळ एका लेकीची भावना नव्हे, तर ती एक सार्वत्रिक वेदना आहे. जिथे पैसा उपयुक्त आहे, पण प्रेम, नातं, आणि माणूसपण यांचं मोल त्याहून खूप मोठं आहे. तिचा आक्रोश अनेकांना डोळे पुसायला भाग पाडतोय… आणि ‘उत्तरदायित्व’ या शब्दाचा अर्थ पुन्हा विचारायला लावतोय.

News Title: “I’ll Give You 2 Crores, Just Bring Back My Father” – Daughter’s Pain After Ahmedabad Plane Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now