कहर! Whatsapp मेसेज सीन करुनही रिप्लाय दिला नाही, पत्नीने पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य!

On: January 13, 2024 7:52 PM
---Advertisement---

Whatsapp News | नवरा बायको हे एक असं नातं आहे ज्यामध्ये प्रेमासोबतच भांडणसुद्धा होत राहतात. या दोघांमध्ये कोणत्या कारणावरुन खटके उडतील काही सांगता येत नाही. यासोबतच कधी कधी सोशल मीडियावरुन देखील पती-पत्नीमध्ये वाद होत असताना दिसतात. दोघांमधील वाद हे शुलक कारणावरुन जरी होत असले तरी मात्र हे वाढायला फार वेळ लागत नाही.

दरम्यान अशाच एका शुल्लक कारणामुळे पती आणि पत्नीमध्ये वाद झालेत. ज्यामुळे पत्नीने तिच्या पतीला थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. मेसेजचा रिप्लाय न दिल्यामुळे सुरू झालेला हा वाद घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचलाय.

काय आहे नेमकं प्रकरण?

पती आणि पत्नी या दोघांमध्ये व्हॉट्सअॅप वरुन वाद झाले आहेत. हा वाद इतका टोकाला गेला की, प्तनीने तिच्या पतीला घटस्फोट मागितला आहे. पत्नीने तिच्या पतीला व्हॅाट्सअॅपवर काही मेसेज केले होते. मात्र पतीने मेसेज सीन केला आणि त्यावर काहीच रिप्लाय नाही केला. त्यामुळे पत्नीला राग अनवार न झाल्याने तिने रागाच्या भरात त्याला घटस्फोट मागितला आहे. सध्या व्हॅाट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट सुद्धा व्हायरल होत आहे.

व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये काय लिहिलं?

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये पती पत्नीला म्हणत आहे की, ‘तु इथे आहेस का? तु माझ्या मेसेजचा रिप्लाय दिला नाहीस? मी तुला घटस्फोट देतो.’ या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनत आहे. याशिवाय अनेकवेळा व्हॅाट्सअॅपवरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाले आहेत.

व्हॅाट्सअॅपमुळे नात्यामध्ये दुरावा

व्हॅाट्सअॅपवर दिवसाचं कामकाज चालत असतं. व्हाट्सअॅपवर मित्र, मैत्रीणी, कुटुंब यांचे वेगवेगळे ग्रुप बनवले जातात. मात्र कधी कधी एखाद्याच्या आयुष्यात व्हॅाट्सअपमुळे भांडण देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय.

पती-पत्नीपेक्षा जुन्या मित्र-मैत्रिणींमध्ये जास्त संवाद होत असल्याने वाद निर्माण होत आहेत. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अनेक अर्ज दाखल झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत.

News Title | Ignoring whatsapp message wife ask for divorce

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News | दादा-भाईंचं आता काही खरं नाही!, पुण्यातील ‘या’ 21 गॅंगसाठी पोलिसांचा खास प्लॅन

Horoscope 2024 | ‘या’ राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा; वाचा राशीभविष्य

Pune Metro पुणेकरांची एक चिंता मिटली, आता मेट्रो स्टेशनला गाडी घेऊन जा बिनधास्त!

SBI Green FD | SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

Rakhi Sawant चा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now