Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा; खूप उपयोगी पडतील

On: December 28, 2023 9:30 PM
Relationship Tips
---Advertisement---

Relationship Tips | कधी कधी खूप प्रेमळ माणसं आपल्याला भेटतात. तर कधी कधी खूप रागीट माणसं देखील आपल्या आयुष्यात असतात. पण एखाद्या गोष्टीचा राग येणं हे सहाजिक आहे. पण प्रत्येक गोष्टीचा राग येऊ लागला तर त्या व्यक्तीसोबत राहणं फार कठीण होऊन बसतं. विशेषत: अशी रागीट व्यक्ती तुमची पार्टनर असते. तर तीला सांभाळणं फार कठीण असतं. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत. ज्याने तुम्ही तुमच्या रागीट पार्टनरशी डील करू शकता.

Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा

रिॲक्ट होऊ नका | जेव्हा जेव्हा पार्टनर रागवतो, त्यावेळी त्याच्याशी हुज्जत घालू नका. जर तुम्ही त्यावेळी रिॲक्ट झालात तर भांडण आणखी वाढेल. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पहा आणि तेव्हा बोला. तुम्ही रिॲक्ट केल्याने रागात असलेल्या व्यक्तीला आणखी राग येईल. पार्टनर चिडला तरी तुम्ही शांतपणे हळू आवाजात बोला. भांडायला जाऊ नका. राग शांत झाला की नीट समजावून सांगा.

शांतपणे उत्तर द्या | प्रेमाने जग जिंकता येतं म्हणतात. तसाच प्रेमाने राग देखील शांत होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचा पार्टनर रागाच्या भरात काही विचारत असेल तर त्याच्या बोलण्याला प्रेमाने उत्तर द्या. अशा परिस्थितीत जोडीदाराचा राग शांत होऊ शकतो.

प्रेमाने समजवा | कुठलीही गोष्ट करण्याची एक वेळ असते. तुम्हाला देखील फक्त वेळेची वाट पहावी लागेल आणि जोडीदाराचा मूड पाहून बोलणं आवश्यक आहे. सर्वप्रथम त्यांना समजावून सांगा की राग येण्याने त्यांच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो.

जाणीव होऊ द्या | पार्टनर चिडला, रागात बोलला तर तुम्हीही चिडून बसू नका. बोलणं बंद करू नका. याने गैरसमज वाढतात. रागात पार्टनर जर काही बोलून गेला ज्याने तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही उलट उत्तर देऊ नका. त्याला जाणीव होईपर्यंत शांत राहा.

अँगर मॅनेजमेंट थेरपी | तुमचा जोडीदार बालपणात काही आघातातून गेला असेल त्यामुळे त्याचा स्वभाव असा झाला आहे का हे समजून घ्या. तुमचा जोडीदार स्वतः या समस्येशी झगडत असेल, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना थेरपीसाठी घेऊन जाऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Aishwarya Rai आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, ‘ही’ कारणं आली समोर

Aishwarya Rai | सलमान सोबतच्या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा, ही कारणं आली समोर

Share Market | झुनझुनवालांनी ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 14,428 कोटी!

‘तिच्यासारखी कोणी भेटलीच नाही’; पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना Ratan Tata भावूक

“Rohit Sharma ने ही मोठी घोडचूक केली”; रवी शास्त्रींनी रोहितच्या नेतृत्त्वावरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now