मोठ्या आवडीने चायनीज खात असाल तर ही बातमी नक्की वाचा!

On: October 22, 2023 3:43 PM
---Advertisement---

मुंबई | चायनिज नुडल्स हा फार लोकप्रिय पदार्थ आहे. अनेकांचे हे आवडीचे पदार्थ आहेत. अगदी लहानांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे हे पदार्थ आवडीने खातात. या पदार्थांमध्ये अजिनोमोटो वापरला जातो. अजिनोमोटोमुळे अरोग्यावर दुष्परिणाम होतात, असं अनेकांकडून ऐकलं असेल. पण खरोखर अरोग्यावर दुष्परिणाम होतो का? चला तर जाणून घेऊया या विषयी सविस्तर माहीती.

अजिनोमोटो आहे तरी काय ?

अजिनोमोटो मोनोसोडियम ग्लूटामेट या उत्पादनाच्या ब्रॅंडचं नाव आहे. जो पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. हा पदार्थ हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्ट फूडच्या पदार्थांमध्ये वापरला जातो. याच्या वापरामुळे पदार्थ घट्ट होण्यास मदत होते. तसेच पदार्थांमध्ये आंबट आणि तुरटपणा येतो. डॉक्टरांच्या मते, हा पदार्थ हानिकारक नाही. हा पदार्थ खाण्यायोग्य आहे. या अजिनोमोटोला किती प्रमाणात पदार्थांमध्ये वापरला जातो. त्या वापरावर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे या पदार्थांच्या वापरण्याच्या प्रमाणावर लक्ष द्यायला हवं.

अजिनोमोटोच्या अतिसेवनाने अरोग्यावर काय परीणाम होतात ?

अजिनोमोटोमध्ये सोडियमचा वापर भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे त्याच्या अतिसेवनाने अरोग्यावर अनेक परिणाम होतात. या पदार्थांच्या वापरामुळे घाम येणे, डोके दुखणे आणि छातीत दुखणे ही लक्षणे होत असल्याचा अनेकजण दावा करतात. या पदार्थांच्या अतिवापराने शारिरीक लठ्ठपणाही येऊ शकतो. रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास आसणाऱ्या व्यक्तींना अजिनोमोटो वापरलेले पदार्थ खाणे चिंतेचे ठरु शकते. या पदार्थाच्या अतिवापराने रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now