“मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर…”; जरांगे सरकारवर भडकले

On: November 13, 2023 7:19 PM
---Advertisement---

जालना | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेले काही दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. अनेक राजकीय नेते मंडळींनी जरांगेंची भेट घेत त्यांना उपोषण मागे घ्या अशी विनंती केल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं.

दरम्यान, आरक्षणाबाबत सरकार कोणताच निर्णय घेत नव्हतं. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. यावेळी त्यांनी बीड येथे काही राजकीय नेत्यांच्या घरावर दगडफेक करत नेत्यांच्या गाड्या जाळल्या होत्या.

त्यानंतर जाळपोळ करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

माध्यमांशी बोलत असताना जरांगे म्हणाले की, “बीडमधील जाळपोळ प्रकरणात मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल केले जात आहेत. येथील पोलीस अधिकारी जातीयवादी आहेत. त्यामुळे ते मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.”

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करुन हा प्रकार थांबवावा. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर दोन दिवसांत बीडमधील मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.”

थोडक्यात बातम्या – 

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने घतेला ‘हा’ मोठा निर्णय

“मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो”

पुणेकरांनो काळजी घ्या! चिंताजनक बातमी समोर 

“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली… 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now